शिर्डी येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय आजपासून सुरू

शिर्डी येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय आजपासून सुरू

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

उत्तर अहमदनगर मधील कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, संगमनेर, अकोले व राहुरी या 6 तालुक्यातील नागरिकांना आता अर्धन्यायिक सुनावणी व इतर शासकीय कामांसाठी अहमदनगर येथे जाण्याची आवश्यक नाही. आज दि. 15 सप्टेंबरपासून शिर्डी येथे नागरिकांच्या सेवेसाठी अपर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू होत आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याहस्ते व खा. सदाशिव लोखंड यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यालयाचे आज उद्घाटन होणार आहे.

अनेक दिवसांपासून नागरिकांना या कार्यालयाची प्रतीक्षा होती. साईबाबा समाधी मंदीराच्या गेट क्रमांक 2 शेजारी सुरू होत आहे. पहिले अपर जिल्हाधिकारी म्हणून बाळासाहेब कोळेकर यांनी पदभार स्विकारला आहे. या कार्यालयासाठी 6 पदांची निर्मिती करण्यात आली आहे. अपर जिल्हाधिकारी हे कार्यालय प्रमुख असणार आहेत. त्याशिवाय नायब तहसीलदार, लघुलेखक (निम्नश्रेणी), अव्वल कारकून व 2 लिपिक टंकलेखक कार्यरत असणार आहेत. अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अखत्यारित शिर्डी, संगमनेर व श्रीरामपूर प्रांतधिकारी तसेच 6 तालुक्यातील तहसीलदार, 51 मंडलाधिकारी असणार आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com