चक्क ! 40 रूपयांचा उद विकला एवढ्या हजार रूपयांना

शिर्डीत साईभक्तांची भामट्याकडून फसवणूक
चक्क ! 40 रूपयांचा उद विकला एवढ्या हजार रूपयांना

शिर्डी |शहर प्रतिनिधी|Shirdi

आग्रा येथून शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाला आलेल्या भाविकाची दिशाभूल करून एका भामट्याने 40 रुपयांची उद पॅकेट चक्क 7 हजार रुपयांना विकून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

आग्रा येथील एका सामान्य कुटुंबातील आणि हॉटेलमध्ये 10 हजार रुपये महिन्याप्रमाणे काम करणार्‍या एका साईभक्तास शिर्डीमध्ये एका भामट्याने हजारो रुपयांना गंडा घातला आहे. साईबाबांच्या धुनीत जाळण्यासाठी अनेक साईभक्त ऊद पॅकेट खरेदी करतात. शिर्डीतील अनेक दुकानांमध्ये पॅकेट 1 ते 2 रुपयांना सहजासहजी मिळतात. मात्र आग्रा येथील या साईभक्ताच्या भावनांचा फायदा घेत व त्याची दिशाभूल करून एका भामट्याने 1 ते 2 रुपयांना मिळणारे ऊद पॅकेट प्रत्येकी 175 रुपयांना विकले.

40 ऊद पॅकेटसाठी या भामट्याने संबंधित भाविकाकडून तब्बल 7 हजार रुपये उकळले आणि पसार झाला. साईबाबांच्या दर्शनासाठी मंदिरात जात असतांंना आणखी एका ठिकाणी ऊद पॅकेटबद्दल चौकशी केली असता आपली फसवणूक झाल्याचे भाविकाच्या लक्षात आले. यानंतर साईभक्त दिपेश कुमार जॉली यांनी शिर्डी पोलीस स्टेशन गाठले. शिर्डी पोलीसांनी तात्काळ सुत्र हलवत अर्ध्या तासातच त्या भामट्यास ताब्यात घेतले. मात्र दूरवरून आलेल्या या साईभक्तांने तक्रार नको, आपल्याला पुन्हा येण्यासाठी मोठी अडचण होईल असे सांगत पैसे मिळाल्याचे समाधान मानले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com