शिर्डी संस्थानच्या नव्या विश्वस्तांची यादी बुधवारी जाहीर होणार

अनेकांच्या ‘कुंडल्या’ची माहिती जमा
शिर्डी संस्थानच्या नव्या विश्वस्तांची यादी बुधवारी जाहीर होणार

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) औरंगाबाद खंडपीठात साईबाबा विश्वस्त मंडळ नियुक्तीसाठी (Appointment of Sai Baba Board of Trustees in Aurangabad Bench) सरकारने मागितलेली दोन आठवड्यांची मुदत 5 जुलै रोजी संपत (Two week term expired) असल्याने नवीन विश्वस्तांची यादी आज न्यायालयात (Court) सादर होणार होती, पण सरकार आता ही यादी 7 जुलैला सादर करणार आहे, अशी माहिती याचिकाकर्त्यांचे वकील अजिंक्य काळे (Lawyer Ajinkya Kale) यांनी दिली.

साईबाबा विश्वस्त मंडळ नियुक्तीची ( Appointment of Sai Baba Board of Trustees) दोन महिन्यांची मुदत मार्चमध्ये संपल्यानंतर उच्च न्यायालयाने (High Court) शासनास अजून दोन आठवडे मुदतवाढ दिली होती. त्याची सुनावणी 22 जुन रोजी ठेवण्यात आली होती. मात्र उच्च न्यायालयात यादिवशी क्राईम बोर्ड (Crime Borad) असल्याने सुनावणीची (Hearing) तारीख बुधवार दि.23 रोजी ठेवली होती. त्यानंतर आज याबाबत सुनावणी होणार होती. पण आता ती दोन दिवस लांबणीवर पडली आहे.

या नव्या विश्वस्त मंडळाच्या यादीवर आक्षेप घेण्याची शक्यता गृहीत धरून सरकारकडून खबरदारी घेतली जात आहे. यासंदर्भात कायदेतज्ज आणि अन्य तज्ज्ञांशी सल्लामसलत (Consultation with legal experts and other experts) केली जात आहे. त्यातून मार्ग करण्याचे प्रयत्न होत आहेत.

यादरम्यान साई संस्थान अध्यक्ष (Sai Institute President), उपाध्यक्ष, विश्वस्त निवडीसाठी (Vice President, Trustee Elections) महाविकास आघाडीत जोरदार रस्सीखेच (Mahavikas Aghadi Race) सुरू होती. मात्र उच्च न्यायालयात सरकारी पक्षाच्या वकिलांनी अजुन दोन आठवड्याची मुदतवाढ घेतल्याने विश्वस्त पदासाठीची चुरस वाढली. त्यानुसार आता ही यादी 7 जुलैला न्यायालयात सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे नव्या विश्वस्तांच्या यादीकडे सर्वांच्या नजरा आहेत.

इच्छुकांची धाकधूक वाढली

देशात दोन नंबरवर असलेल्या श्रीमंत देवस्थान शिर्डी साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या याद्या 23 जूनच्या रात्री सोशल मीडियावर झळकत होत्या. त्यात नगर जिल्ह्यातील अनेक संभाव्य नावे होती. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेस पक्षाच्या वतीने निवड झालेल्या या संभाव्य सदस्यांवर त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव केला. काहींनी फोनवरून शुभेच्छा दिल्या. यातील काही तथाकथित विश्वस्तांनी सत्कारही घेतले. तसेच सोशल मिडीयावर अनेकांच्या अभिनंदनाच्या पोस्ट फोटोंसह झळकत होत्या. आता या यादीतील कोणत्या नेत्याला साईबाबा पावणार याकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे.

अनेकांच्या ‘कुंडल्या’ची माहिती जमा

साईबाबा संस्थानच्या नव्या विश्वस्तांची यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. यापूर्वी अनेक संभाव्य नावांची यादी सोशल मीडियावर झळकत होती. त्यातील नावांची ‘कुंडली’ काहींनी जमा केली आहे. त्यामुळे अधिकृत निवड जाहीर झाल्यानंतर काहींच्या नावाला आक्षेप घेतले जाण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे ही निवड पुन्हा न्यायालयीन प्रक्रियेत अडकण्याची भीती व्यक्त होत आहे.

ही आहे संभाव्य यादी

शिर्डी साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ वाटपात अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे आले आहे. या पदासाठी कोपरगावचे युवा आमदार आशुतोष काळे यांचे नाव या संभाव्य यादीत आहे. उपाध्यक्ष शिवसेना या पदासाठी रवींद्र मिर्लेकर यांचे नाव चर्चेत आहे. या नावाच्या याद्या यापूर्वी सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या आहेत.

- राष्ट्रवादी काँग्रेस संभाव्य यादी- आशुतोष काळे, जयंत जाधव, अजित कदम, पांडुरंग अभंग, महेंद्र शेळके, सुरेश वाबळे, संदीप वर्पे, अनुराधा आदिक, संग्राम कोते.

- काँग्रेस - डॉ. एकनाथ गोंदकर, डी. पी. सावंत, सचिन गुजर, राजेंद्र भोतमागे, नामदेव गुंजाळ, संग्राम देशमुख, सत्यजित तांबे, करण ससाणे.

- शिवसेना- रवींद्र मिर्लेकर, राहुल कनाल, खा. सदाशिव लोखंडे, संगीता चव्हाण, संजय दुसाने, रावसाहेब खेवरे (एक नाव प्रलंबित) याशिवाय तीनही पक्षाकडून काही नावे अचानक पुढे येण्याची शक्यता आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com