शिर्डी संस्थानच्या नव्या विश्वस्तांच्या यादीकडे सर्वांच्या नजरा

शिर्डी संस्थानच्या नव्या विश्वस्तांच्या यादीकडे सर्वांच्या नजरा

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

साईबाबा विश्वस्त मंडळातील (Saibaba temple Board of Trustees) नव्या विश्वस्तांची यादी आज सरकार न्यायालयात सादर करणार (government will present the list of new trustees in court today) की नाही याबाबत कमालीची उत्सुकता असून साईबाबा कुणाला पावणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

साईबाबा विश्वस्त मंडळ नियुक्तीची दोन महिन्यांची मुदत मार्चमध्ये संपल्यानंतर उच्च न्यायालयाने (High Court) शासनास अजून दोन आठवडे मुदतवाढ दिली होती. त्याची सुनावणी 22 जुन रोजी ठेवण्यात आली होती. मात्र उच्च न्यायालयात यादिवशी क्राईम बोर्ड (Crime Borad) असल्याने सुनावणीची तारीख बुधवार दि.23 रोजी ठेवली होती. त्यानंतर 5 जुलै रोजी याबाबत सुनावणी होणार होती. पण आता ती दोन दिवस लांबणीवर पडली. आता ही यादी 7 जुलैला न्यायालयात (Court) सादर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे नव्या विश्वस्तांच्या यादीकडे सर्वांच्या नजरा आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com