शिर्डी शहरात वाढत्या चोरीच्या धर्तीवर संशयित गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलिसांची विशेष मोहीम

शिर्डी शहरात वाढत्या चोरीच्या धर्तीवर संशयित
गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलिसांची विशेष मोहीम

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

शिर्डी शहरात वाढत्या चोरीच्या धर्तीवर संशयित गुन्हेगारांना पकडण्यासाठी शिर्डी पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली असून या मोहिमेच्या अनुषंगाने ज्या ठिकाणी दोन स्टाईल चोरीच्या घटना घडलेल्या आहेत त्या परिसरात नाकेबंदी करून मोहीम यशस्वी केली आहे.

ज्या ठिकाणी दोन स्टाईल चोरीच्या घटना घडलेल्या आहेत त्या परिसरात नाकेबंदी करून विना नंबरचे दुचाकी वाहने वाढलेले केस कानात असलेल्या बाळ्या, डोक्यावर वाढलेले केस टपोरी सारखा असलेला पेहराव त्याबरोबरच संशयित वाटेल असे दुचाकी धारक पकडण्यासाठी मोठी कारवाई गेल्या 15 दिवसापासुन सुरू यात वाहनाचे कागदपत्रे लायसन्स आदींची देखील चौकशी केली जात असुन ज्याच्याकडे कागदपत्रे नाही अशा तरुणावर कारवाई देखील करण्यात आली आहे अशी माहिती शिर्डी पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी दिली

धुमस्टाईल पध्दतीने चोरीच्या घटना रोखण्यासाठी सुरू केलेल्या मोहीमेला चांगले यश मिळत असुन आठ दिवसांत अशा पद्धतीने गुन्हा घडलेला नाही अचानक कोणत्याही चौकात कुठल्याहीवेळी ही मोहीम विषेश पोलीस पथकाकडून राबविण्यात येत आहे. त्याचा धसका देखील काही जणांनी घेतला आहे. या मोहिमेच्या माध्यमातून नक्कीच संशयित गुन्हेगार पकडले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जे गुन्हेगार रेकॉडवर होते त्यांच्या हालचालींवर देखील आमचे बारीक लक्ष ठेवून असुन रात्री बेरात्री देखील घरी जाऊन तो घरी आहे का बाहेर आहे याची देखील माहिती घेतली जात आहे. अशा संशयीत तरुणांची कोणाला काही माहिती असेल तर त्यांनी ती देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन शिर्डी पोलिसांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.