साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदावरून कॉग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच

साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदावरून कॉग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच

राहाता | प्रतिनिधी

साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ नेमण्यासाठी‌ उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दोन आठवड्यांची मुदत ‌दिल्यानंतर विश्वस्त मंडळ नियुक्तीला वेग आला असुन त्यासाठी मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू झाल्या आहेत.

शिर्डीचे संस्थानच्या अध्यक्षपदावरून कॉग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच पहायला मिळत आहे. या संदर्भात महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रीया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी या विषयी अधिक भाष्य‌ करण्याच तूर्त टाळल आहे.

साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदावरून कॉग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच
कलाप्रेमींनी जपला मानवतावाद

सिद्धीविनायक मंदिर शिवसेनेकडे असल्याने पंढरपुर आणि शिर्डी मंदिराच्या अध्यपदावरून कॉग्रेस आणि राष्ट्रवादी मध्ये रस्सीखेच सुरू आहे. अहमदनगर जिल्हयात राष्ट्रवादीचे सर्वाधिक ६ आमदार असल्याने राष्ट्रवादीने शिर्डी संस्थानच्या अध्यक्षपदावर दावा केला आहे तर कॉग्रेस देखील अध्यपदाची मागणी करत आहे.

२०१४ साली राज्यात भाजप आणि शिवसेनेची सत्ता आल्यानंतर साईबाबा संस्थानवर भाजप आणि शिवसेनेच्या निगडीत नेत्यांची वर्णी लागली होती. संस्थानचे अध्यक्षपद आणि उपाध्यक्ष पदावर भाजपची वर्णी लागल्याने शिवसेनेने नाराजी व्यक्त केली होती. शिवसेनेच्या वतीने नियुक्त झालेल्या विश्वस्तांनी पदभार न घेता दूर राहणे पसंत केले होते. उपाध्यक्षपद शिवसेनेला द्या अशी मागणी त्यावेळी होती. त्यानंतर तीन वर्षाचा कार्यकाळ पुर्ण झाल्यानंतर डॉ. सुरेश हावरे यांच्या अध्यक्षतेखालील विश्वस्त मंडळ संपुष्टात आले होते.

साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदावरून कॉग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच
निमोणसह ५ गावांना ग्रॅव्हिटीद्वारे भोजापूर धरणाचे पाणी मिळणार

ऑक्टोबर २०१९ मध्ये संस्थानचा कारभार पाहण्यासाठी जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्तेखाली तदर्थ समिती नेमण्यात आली. जिल्हा न्यायाधीश, अतिरिक्त विभागीय आयुक्त, धर्मादाय आयुक्त नगर तसेच संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा तदर्थ समितीत समावेश आहे.

मात्र राज्यात सत्तापालट झाल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार आले तेव्हापासुन महामंडळे आणि राज्य सरकारच्या अखत्यारित असलेल्या देवस्थानांवरील विश्वस्त मंडळाच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. माननीय उच्च न्यायालयाने राज्य सरकारला २२ जूनपर्यंत शिर्डी साईबाबा विश्वस्त मंडळ नेमणुकी संदर्भात माहीती देण्याचे आदेश दिल्यानंतर महाविकास आघाडीकडून शिर्डी विश्वस्त मंडळ नेमण्या‌ संदर्भात हालचाली गतिमान झाल्या आहेत.

विश्वस्तपदी वर्णी लागावी यासाठी तिनही पक्षाच्या नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे फिल्डींग लावली आहे. देशातच नव्हे तर परदेशातही साईबाबा संस्थानच्या अध्यक्षांना आणि विश्वस्तांना मान मिळत असल्याने विश्वस्त पद पदरी पाडून घेण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com