श्रीरामपूर |प्रतिनिधी|Shrirampur

शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या एका महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकाने सहकारी महिला शिक्षिकेचा विनयभंग केल्याप्रकरणी

शिर्डी पोलिसांनी मुख्याध्यापका विरूद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे तालुक्यातील शैक्षणिक वर्तूळात खळबळ उडाली आहे.

दरम्यान शिर्डी पोलीस ठाण्यात या घटनेबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेले मुख्याध्यापकाचे नाव गंगाधर विश्वनाथ वरघुडे (वय 52) रा. शिर्डी असे आहे. संस्थानच्या महाविद्यालयात संबधीत महिला शिक्षिका गेल्या पाच वर्षापासून नोकरी करत असून या शिक्षिकेने शिर्डी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मुख्याध्यापक गंगाधर वरघुडे हा वेळोवेळी वाईट नजरेने बघणे, कामाच्या ओघात शरीर स्पर्श करणे, कार्यालयात गेल्यावर वाईट हेतूने पकडणे अशी कृत्य करत होता. याबाबत वरिष्ठ अधिकारी यांना देखील माहिती दिली होती.

मात्र कठोर कारवाई न झाल्याने त्याचे धाडस वाढतच गेले. दि. 6 फेब्रुवारी 2021 रोजी दोन वाजेच्या सुमारास ड्युटीवर असतांंना मुख्याध्यापक गंगाधर वरघुडे याने काम आहे, असे सांगत कार्यालयात बोलावले व मोबाईल मधील अश्लील व्हिडिओ दाखवण्यास सुरुवात केली. त्यास नकार दिला असता जबरदस्ती केली. मी मदतीसाठी ओळखीच्या शिक्षकेला विनंती केली असता त्यांनी देखील सरांना असे करू नका असे सांगितले.

त्यावेळी त्यांनी झालेला प्रकार कोणाला सांगितला तर संपवून टाकीन माझ्या राजकीय ओळखी फार आहेत. त्यामुळे कोणाला काही सांगू नका अशी धमकी दिली, अशी फिर्याद शिक्षिकेने शिर्डी पोलिसात दाखल केल्याने शिर्डी पोलिसांनी मुख्याध्यापक गंंगाधर वरघुडे याच्या विरूद्ध कलम 354 अ,354 ड, 506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपीस अद्याप अटक नाही.