शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

महाविकास आघाडीच्यावतीने येणार्या आर्थिक वर्षात हॉटेल, गाळा, दुकाने, इतर वास्तू बंद राहणार असल्याने करमाफी करण्यात यावी

अशी मागणी शिर्डीच्या महाविकास आघाडीच्यावतीने तसेच नागरिकांनी शिर्डी नगरपंचायतचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांच्याकडे केली आहे.

नगरपंचायत अधिनियम 1966 चे कलम 127 प्रमाणे करमाफी करण्यात यावी, असे अर्ज मालमत्ताधारकांना उपलब्ध करून दिले. ते अर्ज भरून मोठ्या संख्येने नागरिक शिर्डी नगरपंचायत कार्यालयात जमा करण्यासाठी गेले असता मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी अर्ज स्विकारण्यास नकार दिला.

त्यामुळे महाविकास आघाडीच्यावतीने शिवसेना नेते कमलाकर कोते, राष्ट्रवादी काँग्रेसचे महेंद्र शेळके, राष्ट्रीय काँग्रेसचे सचिन चौगुले यांच्या नेतृत्वाखाली मुख्यधिकार्यांना भेटून सर्व अर्ज स्विकारून करमाफी देण्याची मागणी केली.

चर्चेअंती अर्ज स्विकारणे सुरू केले व करमाफीसाठी अर्ज, हॉटेल, रजिस्टर, बंद फोटो आदी पुरावे सादर करण्याचे सांगितले. तसेच नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व विद्यमान नगरसेवक यांच्या उपस्थितीत मालमत्ता बंद असल्याचे पंचनामे करावेत व कुलूप लावून चावी नगरपंचायतकडे जमा करावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.

याप्रसंगी निलेश कोते, सुनील गोंदकर, रवींद्र कोते, सचिन कोते, राहुल गोंदकर, अमृत गायके, जयराम कादळकर, दीपक गोंदकर, हरिराम रहाणे, नवनाथ विश्वासराव आदी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.