शिर्डी सोसायटीच्या निवडणुकीत विमानाची उंच भरारी!

विरभद्र पँनलला ११ तर परिवर्तन पँनलला २ जागा
शिर्डी सोसायटीच्या निवडणुकीत विमानाची उंच भरारी!

शिर्डी । शहर प्रतिनिधी

जिल्ह्यातील अग्रगण्य असणाऱ्या शिर्डी कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीत माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील, खा.डॉ सुजय विखे पाटील, साईसंस्थानचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली विरभद्र पँनलचे ११ उमेदवार विजयी झाले तर परिवर्तन पँनलच्या २ जागा विजयी झाल्याने चुरशीच्या लढतीत सोसायटीवर विमानाने उंच भरारी घेऊन निर्विवाद सत्ता मिळवली आहे.

दरम्यान सन २०२२ -२७ शिर्डी कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीत १३ जागांसाठी ८७ अर्ज दाखल करण्यात आले होते. निवडणूक जशीजशी जवळ येत चालली त्यानुसार अनेकांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे यंदाची सोसायटीची निवडणूक बिनविरोध होणार असे चित्र दिसू लागले होते. शेवटी २७ अर्ज शिल्लक राहिल्याने एक अपक्ष उमेदवार सोडून दोन पँनल पडले.

यामध्ये माजीमंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील, खा.डॉ सुजय विखे पाटील, आ.आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली विमान चिन्ह असलेला विरभद्र पँनल आणी दुसरा साईसंस्थानचे विश्वस्त डॉ एकनाथ गोंदकर यांच्या नेतृत्वाखाली कपबशी चिन्ह असलेला परिवर्तन पँनल उभे होते. तर राजेंद्र हरिभाऊ गोंदकर हे ट्रँक्टर या चिन्हावर अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उभे होते.

आज शनिवार दि.१४ रोजी सकाळी श्री साईनाथ विद्यालयात मतदान केंद्रावर पार पडलेल्या प्रक्रियेत सोसायटीच्या एकूण ९०३ मतदारांपैकी ८४० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सर्वसाधारण ८ जागांसाठी १५ उमेदवार रिंगणात होते. यापैकी सहा उमेदवार विरभद्र पँनलचे तर दोन उमेदवार परिवर्तन पँनलचे विजयी झाले आहे. त्याचप्रमाणे पाच राखीव जागांमध्ये सर्वच विरभद्र पँनलचे उमेदवार विजयी झाले आहे.

एक अनुसूचित जमातीसाठी दोन उमेदवार उभे होते त्यापैकी दोन्हीही विमान चिन्ह असलेले विरभद्र पँनलचे विजयी झाले. एक ओबीसी जागेवर ३ उमेदवार होते यापैकी एक अपक्ष होते. यामध्ये देखील विरभद्रचे उमेदवार विजयी झाले आहे. तसेच महिला राखीव जागांसाठी तीन उमेदवार उभे होते. यात विरभद्रचे दोन उमेदवार विजयी झाले आहे.

मतदान केंद्रावर तीन केंद्र उभारण्यात आले होते. एकूण २४ कर्मचारी तसेच ५ पोलीस कर्मचारी, संस्थेचे ५ कर्मचारी उपस्थित होते. मतमोजणी प्रक्रिया दुपारी साडेचार वाजता सुरू करण्यात आली आणी सायंकाळी साडेसहा वाजता पूर्ण झाली. यादरम्यान कोणताही वाद झाला नसून अतिशय शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी रावसाहेब खेडकर यांनी सांगितले.

यावेळी कैलासबापू कोते, बाबासाहेब कोते, विश्वस्त महेंद्र शेळके, ज्ञानेश्वर गोंदकर, दिगंबर कोते, शिवाजी गोंदकर,अभय शेळके, निलेश कोते, सुजित गोंदकर, मधुकर कोते, विलास कोते, सुनील गोंदकर, सुधीर शिंदे, सचिन शिंदे आदींनी विक्टरी दाखवून जल्लोष केला.

Related Stories

No stories found.