शिर्डीतील श्रीरामनवमी उत्सवाची सांगता

शिर्डीतील श्रीरामनवमी उत्सवाची सांगता

शिर्डी |प्रतिनिधी|Shirdi

श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्यावतीने 20 एप्रिलपासून सुरु असलेल्या श्रीरामनवमी उत्सवाची सांगता काल काल्याच्या कीर्तनानंतर दहीहंडी फोडून झाली.

उत्सवाच्या सांगता दिनी पहाटे 4.30 वाजता काकड आरती, त्यानंतर पहाटे 5.20 वाजता श्रींचे मंगलस्नान व शिर्डी माझे पंढरपूर ही आरती झाली. सकाळी 6.30 वाजता संस्थानचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे व त्यांची सुविद्य पत्नी वैशाली ठाकरे यांच्या हस्ते गुरुस्थान मंदिरात रुद्राभिषेक पूजा करण्यात आली. यावेळी मंदिर प्रमुख रमेश चौधरी व मंदिर पुजारी उपस्थित होते.

मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे व त्यांची पत्नी प्रतिक्षा घोरपडे यांच्या हस्ते समाधी मंदिरात श्रींची पाद्यपुजा करण्यात आली. सकाळी 10 वाजता मंदिर कर्मचारी संभाजी तुरकणे यांचे गोपाळकाला कीर्तनानंतर मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे यांच्या हस्ते समाधी मंदिरात दहीहंडी फोडण्यात आली. यावेळी उप मुख्यकार्यकारी अभियंता रघुनाथ आहेर, संरक्षण अधिकारी पोलिस उपनिरिक्षक आण्णासाहेब परदेशी, मंदिर प्रमुख रमेश चौधरी व मंदिर पुजारी उपस्थित होते. त्यानंतर दुपारी 12.10 वाजता श्रीं ची माध्यान्ह आरती झाली. सायंकाळी 6.30 वाजता श्रींची धुपारती तर रात्रौ 10.30 वाजता शेजारती झाली.

करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर श्रीरामनवमी उत्सव साध्या पध्दतीने साजरा करुन रुढी परंपरेनुसार यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थानचे प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, संरक्षण अधिकारी पोलिस उपनिरिक्षक आण्णासाहेब परदेशी, सर्व प्रशासकीय अधिकारी, सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com