शिर्डीत रंगणार भव्य कुस्त्यांची दंगल; रांगडे पैलवान शड्डू ठोकून तयार

लाखो रुपयांचे बक्षिसांसह साईकेसरी व मानाची गदा
शिर्डीत रंगणार भव्य कुस्त्यांची दंगल; रांगडे पैलवान शड्डू ठोकून तयार

शिर्डी | शहर प्रतिनिधी

आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र शिर्डीत यंदाच्या शतकोत्तरी रौप्यमहोत्सवी रामनवमी उत्सवानिमित्ताने भव्य कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली असून लाखो रुपयांच्या बक्षीसांबरोबरच पहिल्या चार विजेत्या मल्लांना साईकेसरी पट्टा आणी मानाची गदा देण्यात येणार असल्याची माहिती श्री रामनवमी यात्रा कमिटीचे अध्यक्ष कमलाकर कोते यांनी दिली.

दरम्यान यंदा श्री रामनवमी उत्सवानिमित्त दि.११ एप्रिल रोजी श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था तसेच शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. श्री साईचरीत्रात अध्याय क्रमांक ५ मध्ये साईबाबांच्या कुस्तीचे वर्णन केलेले आहे. त्यामुळे कुस्तीची परंपरा देखील श्री साईबाबांच्या हयातीपासून सुरू असल्याने देशातील दिग्गज पैलवान साईबाबांच्या श्रद्धेपोटी शिर्डी शहरात कुस्त्या खेळायला येत असतात.

शिर्डीत रंगणार भव्य कुस्त्यांची दंगल; रांगडे पैलवान शड्डू ठोकून तयार
शिर्डीत साकारण्यात येणार २५ हजार स्के.फुटाची भव्य रांगोळी

यावर्षी पहिले बक्षीस ७१ हजार रुपयांचे ठेवण्यात आले आहे. तर ५१ हजार रुपयांचे दुसरे बक्षीस आहे, त्याचप्रमाणे तिसरे ४१ हजार, १५ हजार रुपयांच्या दोन आणी विशेष म्हणजे महिलांंसाठी ११ हजार रुपयांच्या तीन कुस्त्या ठेवण्यात आल्या असून पहिल्या चार कुस्ती विजेत्या पहिलवानांना साईकेसरी पट्टा आणी मानाची गदा देण्यात येणार आहे.

या ऐतिहासिक कुस्ती स्पर्धेत जास्तीत जास्त पहिलवानांनी आपले नावे, वजन दि.११ एप्रिलपर्यंत सकाळी ११ ते २ वाजेपर्यंत कुस्ती कमिटीचे सदस्य यांच्याकडे नोंदवावी असे आवाहन करण्यात आले आहे. रामनवमी उत्सव यात्रा कमिटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष कमलाकर कोते यांनी यंदाच्या ऐतिहासिक रामनवमी उत्सवाची सुत्रे हाती घेताच सर्व जेष्ठ तसेच युवा ग्रामस्थांना बरोबर घेऊन उत्सवाची जोरदार तयारी सुरू केली आहे. शिर्डीतील तरुणांचा उत्साह वाढला आहे.त्यामुळे यंदाच्या वर्षी मोठ्या प्रमाणावर हि कुस्ती स्पर्धा डोळ्याचे पारणे फेडणारी ठरणार आहे.

शिर्डीत रंगणार भव्य कुस्त्यांची दंगल; रांगडे पैलवान शड्डू ठोकून तयार
'साई'नामाच्या गजरात शिर्डीत पार पडली परिक्रमा

या स्पर्धेसाठी देशातील हिंद केसरी तसेच महाराष्ट्र केसरी बहुमान पटकावलेले नामवंत पहिलवान हजेरी लावणार आहे.त्यामुळे यंदाचा कुस्ती हगामा ऐतिहासिक ठरणार आहे. यासाठी कुस्ती कमिटीचे अध्यक्ष रवींद्र गोंदकर, उपाध्यक्ष रवींद्र कोते, ताराचंद कोते, अविनाश गोंदकर, विजय कोते,अरविंद कोते,सचिन तांबे, अतूल गोंदकर आदी परिश्रम घेत आहे.

शिर्डीत रंगणार भव्य कुस्त्यांची दंगल; रांगडे पैलवान शड्डू ठोकून तयार
रंग खेलेंगे 'साई' के संग! शिर्डीत रंगपंचमीचा उत्साह, पाहा VIDEO

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com