साई मंदिरात फुलला भक्तिचा मेळा

पहिल्याच दिवशी 11 तासांत 11 हजार भाविकांचे दर्शन
साई मंदिरात फुलला भक्तिचा मेळा
Sai Temple

शिर्डी | शहर प्रतिनिधी

जगविख्यात श्री साईमंदीर (Sai Temple) घटस्थापनेच्या मुहुर्तावर खुले (Temple reopen) करण्यात आले असून गुरूवार दि.७ रोजी श्रींची पाद्यपुजेने काकड आरतीने सुरवात झाली आहे.

भाविकांच्या स्वागतासाठी ग्रामस्थांनी मंदीर परिसरात द्वारकामाई (Dwarakamai) व चावडीला (Chawadi) आकर्षक रांगोळ्या काढून सजावट करण्यात आली असून सुनी झालेली साईनगरी भाविकांच्या आगमनाने भक्तीभावाने पुन्हा फुलुन गेली आहे. पहिल्याच दिवशी 11 तासांत 11 हजार भाविकांचे दर्शन आँनलाईन पध्दतीने तर ग्रामस्थांनी साईदर्शनाचा लाभ घेतला असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सांगितले.

चावडीला आकर्षक फुलांची सजावट
चावडीला आकर्षक फुलांची सजावट

दरम्यान गुरुवारी घटस्थापनेला पहाटे काकड आरतीसाठी आँनलाईन पासेस तसेच देणगीदार असे ७५ भाविकांनी लाभ घेतला. यावेळी ग्रामस्थांसाठी मंदिर परिसरातील १६ गुंठे येथून स्वतंत्र आधारकार्ड दाखवून पासेसची व्यवस्था करण्यात आहे.

मंदिर परिसरात संस्थानच्या वतीने सोशल डिस्टंसिंग, मास्क, थर्मल स्क्रिनींगची व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी साईसमाधीचे दर्शन घेतलेल्या भाविकांनी समाधान व्यक्त केले.यावेळी साईबाबा संस्थानचे उपमुख्यकार्यकारी रवींद्र ठाकरे यांनी

प्रसारमाध्यमांपुढे बोलतांना सांगितले की सर्व भाविकांनी शासनाच्या नियम अटीशर्तीचे पालन करणे बंधनकारक असून दर्शनरांगेत भाविकांसाठी सँनिटायझर, मास्क सक्तीचे करण्यात आले असून पहाटे सहा वाजेपासून सकाळी साडेसात वाजेपर्यंत दिड तासात आँनलाईन पध्दतीने एक हजार विस भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. तर पाचशे ग्रामस्थांनी आधारकार्ड दाखवून दर्शन घेतले.

साईमंदीरात नवरात्रोत्सवाचा पहिला दिवस असल्याने साईमंदीराला बेंगळुरू येथील साईभक्त सतिशजी बानाकट्टी यांनी तिन लाख रुपये खर्च करून आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. संस्थानच्या वतीने दिवसाला पंधरा हजार आँनलाईन पासेसची व्यवस्था करण्यात आली असल्याने सोळा तासात पंधरा हजार भाविकांना दर्शनाचा लाभ मनमुरादपणे घेता येणार आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर साईमंदीर दोन वेळा बंद करण्यात आले होते. संस्थान प्रशासनाच्या वतीने आज गुरुवारी पहाटे पुन्हा मंदीराचे दरवाजे खुले झाले आहे. प्रत्येक भाविक आँनलाईन दर्शनाचा पास घेऊनच शिर्डी नगरीत आले असल्याचे भाविकांनी सांगितले. कोव्हीड काळात १६ नोव्हेंबर २०२० रोजी साईमंदीर खुले करण्यात आले होते, त्यानंतर १७ मार्च २०२१ रोजी पुन्हा बंद केले आता आज दि.७ आँक्टोंबर २०२१ रोजी पुन्हा सुरू झाले आहे. संस्थानच्या इतिहासात साईमंदीर सहा महिने बंद आणी सहा महिने सुरू केले होते.आता एकंदरीतच शिर्डी ग्रामस्थांसाठी आज सोनियाचा दिन उगवला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून भक्ताविना सुन्न असणारी शिर्डी आज साई मंदिर उघडल्याने भक्तांच्या आगमनाने अतिशय आनंदी व भक्तिमय वातावरणाने प्रफुल्लीत झाली.आम्ही साई भक्तांचे स्वागत रांगोळी काढून व दिपोत्सव करून केले.

- सचिन तांबे, माजी विश्वस्त, साईसंस्थान शिर्डी

Related Stories

No stories found.