साईसंस्थान सर्वत्र साईमंदिरे उभारणार

गावोगावी साई मंदिर बांधकामासाठी संस्थानकडून 50 लाखांपर्यंत मदत
साईबाबा
साईबाबा

शिर्डी | प्रतिनिधी

साईबाबांच्या शिकवणुकीचा प्रचार व प्रसारासाठी साई संस्थानकडून देशभर साई मंदिर उभारणीचे विचाराधीन आहे. याकरीता एखाद्या संस्थेने किंवा राज्य सरकारने पाच एकर जागा उपलब्ध करून दिल्यास तेथे साई संस्थान शिर्डीसारखेच मंदिर उभारणार आहे. याशिवाय तेथे रुग्णालय, अन्नदान आदी उपक्रम राबवले जाणार आहेत. याशिवाय गावोगावी नव्याने उभारण्यात येणार्‍या साईबाबांच्या मंदिरांचे बांधकामासाठी पन्नास टक्के रक्कम अथवा 50 लाखापेक्षा जी रक्कम कमी आहे ती रक्कम मदत करण्याचा साई संस्थान विचार करत असल्याची माहिती साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.शिवा शंकर यांनी दिली.

साईबाबा संस्थानच्या वतीने नवीन साई मंदिर निर्माण धोरण, डोनेशन धोरण, जगभरातील साई मंदिर असोसिएशनची स्थापना आदी प्रस्तावित उपक्रमांबाबत संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवा शंकर यांनी पत्रकार परीषदेत माहिती दिली. ते म्हणाले, यापुढे भाविक ज्या प्रमाणात देणगी देतील, त्याप्रमाणात त्यांना वर्षभर ठराविक दिवशी आरती व दर्शनाची सुविधा संस्थानकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी साई संस्थान युनिक आयडी कार्ड बनवणार आहे. यापूर्वी श्रीसाई समाधीवर शाल पांघरण्यासाठी सोडत पद्धत अवलंबिण्यात येत होती. आता यातही मोठ्या देणगीदारांना ही संधी उपलब्ध करून देण्याबाबत श्रीसाई संस्थानने प्राथमिक प्रस्ताव तयार केलेला आहे. जगभरातील व देशभरातील श्रीसाई मंदिरांची असोसिएशन स्थापन करण्याबाबतही श्रीसाई संस्थानचा विचार सुरू आहे. उपरोक्त धोरणांबाबतची माहिती संस्थानचे www.sai.org.in या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे. या धोरणांबाबत भाविक व ग्रामस्थांच्या सूचना ceo.ssst@sai.org.in या ई-मेलवर मागवण्यात येत आहेत.

साईबाबा
Crime News : पत्नीनेच केला पतीचा खून केला; भावाच्या मदतीने काढला काटा

याचबरोबर रक्तदान, कर्मचारी सेवा प्रवेश नियम, आरती सशुल्क पासेस आदींबाबत पुढीलप्रमाणे अमंलबजावनी करण्यात येणार आहे. साई मंदिर परिसरात भाविकांकडून रक्तदान केले जाते. यापुढे साई मंदिर परिसरात भाविकांकडून दानात मिळालेले रक्त रुग्णांना मोफत देण्यात येणार आहे. श्रीसाई मंदिर परिसरात काही बाहेरील रक्तपेढ्यांनाही रक्त संकलन करण्यास परवाणगी देण्यात आलेली आहे. त्यांनाही हे रक्त रुग्णांना मोफतच द्यावे लागणार आहे. याबाबत संस्थानकडून संबंधित रुग्णांशी संपर्क करून खातरजमा करण्यात येणार आहे. या रक्त पिशव्यांवर संस्थानचा टॅग असेल व नॉट फॉर सेल असे लिहिलेले असेल.

साईबाबा
संगमनेरात गॅस कटरने ATM मशीन फोडले, १४ लाख रुपये लंपास

महाराष्ट्र शासनाचे सुचनांप्रमाणे साईबाबा संस्थानचे कर्मचारी यांचेसाठी सेवा प्रवेश नियम तयार केलेले आहेत. अंतीम करणेत आलेले सेवा प्रवेश नियम संस्थानचे www.sai.org.in या अधिकृत संकेतस्थळावरउपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. याबाबत अधिकारी, कर्मचारी, कर्मचारी संघटना यांच्या हरकती असल्यास पुढील सात दिवसाचे आत संस्थानकडे जमा करावयाच्या आहेत. आरती पासेसमध्ये होणारा गैरवापर रोखण्यासाठी साईबाबांचे आरतीच्या सशुल्क पासेससाठी शिफारस करताना यापुढे संबंधीत भाविकांचे आधार कार्ड व मोबाइल नंबर द्यावे लागणार आहेत. दि. 01ऑक्टोबर 2023 पासून प्रायोगिक तत्त्वावर याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. टोकन नंबरसाठी बुकिंग केल्यावर पासेस कन्फरमेशनबाबत संबंधित भाविकाच्या मोबाइलवर मेसेज पाठवला जाणार आसल्याचे कार्यकारी अधिकारी पी. शिवशंकर यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com