
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन रविवार दि 28 मे रोजी शिर्डीत होत असून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे. या अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
दि.27 मे रोजी सकाळी 11 वाजता रिपब्लिकन पक्षाची राष्ट्रीय कार्यकारणीची बैठकी शिर्डी येथील हॉटेल इन पॅलेसमध्ये होणार असून या बैठकीत पक्षाचे नॉगालँड राज्यातील विधानसभेला नुकतेच निवडून आलेले आ. ए लिमा वन चांग व आ. लिमटिचाबा चांग यांचा सत्कार तर दुपारी राखीव वेळ असून कार्यकर्त्याच्या भेटीगाठी घेवून समस्या जाणून घेतल्या जातील. रविवारी 28 मे रोजी सकाळी 11 वाजता ना. रामदास आठवले यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद होणार आहे तर संध्याकाळी 5 वाजता कांदा मार्केट समोरील गोदावरी वसाहत शेजारील मैदानात सभा होणार आहे.
या अधिवेशनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह रिपाई महीला आघाडी राष्ट्रीय अध्यक्षा सिमाताई आठवले, भाजपाचे ज्येेष्ठ नेते मधुकरराव पिचड, खा. सदाशिव लोखंडे, खा. डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डीले, आ बबनराव पाचपुते, आ. राम शिंदे, आ. मोनिका राजळे, स्नेहलता कोल्हे, चद्रकांता सोनकांळे, माजी सामाजिक राज्यमंत्री अविनाश महातेकर, रिपाई प्रदेशाध्यक्ष राजा सरवदे, प्रदेश कार्याध्यक्ष बाबुराव कदम, गौतम सोनवणे, युवा राष्ट्रीय अध्यक्ष पप्पू कागदे, सूर्यकांत वाघमारे, भाजपा दक्षिण जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे, उत्तर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, शहर जिल्हाध्यक्ष भैया गंधे, कार्यकर्ते उपस्थित रहाणार आहे.
तरी या दोन दिवशीय अधिवेशनाची संपूर्ण तयारी झाली असून या अधिवेशनाकरिता लाखोंच्या संख्येने उपस्थिती रहाणार असल्याने आयोजकांकडून चोख नियोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव, प्रदेश उपाध्यक्ष विजय वाकचौरे, उत्तर महाराष्ट् अध्यक्ष राजाभाऊ कापसे, बाळासाहेब गायकवाड, राज्य सचिव दिपक गायकवाड, उत्तर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे, जिल्हा विभागप्रमुख भिमा बागुल, युवक जिल्हाध्यक्ष पप्पू बनसोडे, चंद्रकांत सरोदे, धनजंय निकाळे, कैलास शेजवळ, रमेश शिरकांडे, रावसाहेब बनसोडे, किरण कोळगे, आशिष शेळके, सुनिल शिरसाठ, राजेंद्र गवांदे, अनिल नन्नवरे, विलास साळवे, संजय भालुमे, राजू उंबाळे, राजाभाऊ जगताप, सुशिल धायंजे, बाबा राजगुरु, सतिष मगर, अविनाश भोसले, किरण दाभाडे, अमित काळे, विजय पवार यांनी दिली आहे.
शिर्डीतून लोकसभेवर शिक्कामोर्तब होणार
दरम्यान सदरचे अधिवेशन हे शिर्डीत घेऊन ना. आठवले शिर्डी लोकसभा लढवण्याची तयारी करताना दिसत असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व ना.विखे याचे समोर शिर्डी लोकसभा तिकिटावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे बोलले जात असून या अधिवेशनाद्वारे लोकसभेचे रणशिंग फुंकले जाणार आहे.