रामनवमी उत्सवात साईंच्या चरणी साडेचार कोटींचं दान!

किती आहे सोनं, चांदी अन् परकीय चलन?
रामनवमी उत्सवात साईंच्या चरणी साडेचार कोटींचं दान!

शिर्डी | शहर प्रतिनिधी

संपूर्ण विश्वाला श्रध्दा आणी सबुरीचा उपदेश देणाऱ्या शिर्डी (Shirdi) येथील श्री साईबाबांच्या (Saibaba) तीन दिवसीय श्री रामनवमी (ram navami) उत्सवात दोन वर्षाच्या कालावधीनंतर प्रथमच ३ लाख भाविकांनी साईदरबारी हजेरी लावली असून श्री साईबाबांच्या दानपेटीत ४ कोटी ५७ लाख ९१ हजार रुपयांचे घसघशीत दान प्राप्त झाल्याची माहिती श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे (Ashutosh Kale) यांनी दिली.

दरम्यान यासंदर्भात शुक्रवार दि.१५ एप्रिल रोजी श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांनी श्री साईबाबा संस्थानच्या शिर्डी येथील साईअतिथी गृहात पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते.

रामनवमी उत्सवात साईंच्या चरणी साडेचार कोटींचं दान!
साईबाबांच्या रांगोळीची 'वर्ल्ड बुक ऑफ लंडन'मध्ये नोंद

यावेळी त्यांनी सांगितले की, दि.९ एप्रिल ते ११ एप्रिल दरम्यान श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ तसेच शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने साईबाबांच्या हयातीपासून सुरू असलेला श्री रामनवमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवात देश विदेशातील लाखो भाविकांनी साईदरबारी हजेरी लावून श्री साईसमाधीचे दर्शन घेतले. या तीन दिवसीय उत्सवात सुमारे ३ लाख भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.

साईसंस्थानच्या द्वारावती भक्तनिवास, साईआश्रम, सेवाधाम याठिकाणी १८ हजार भाविकांनी निवास केला. यादरम्यान राज्यातून तसेच परराज्यातील ५३ पालख्या आल्या होत्या. यामध्ये १० हजार भाविकांची उपस्थिती होती. या पदयात्रीसाठी साईआश्रम धर्मशाळा येथे निवासाची व्यवस्था करण्यात आली होती. २ लाख २० हजार लाडू प्रसादाची विक्री झाली. तर साईप्रसादालयामध्ये १ लाख ४५ हजार ५९४ भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला. तसेच १ लाख १५ हजार नाष्टा पाकिटे वाटप करण्यात आली.

रामनवमी उत्सवात साईंच्या चरणी साडेचार कोटींचं दान!
७ दिवस, ७ हजार किलो रांगोळी अन् ४० कलाकार; डोळ्याचे पारणे फेडणारी साईबाबांची विश्वविक्रमी रांगोळी पुर्ण, पाहा फोटो

किती आहे सोनं, चांदी अन् परकीय चलन?

देणगी स्वरूपात रोख रक्कम सुमारे ४ कोटी २६ लाख रुपये दानपेटीत जमा झाले. त्याचप्रमाणे १५ लाख ६४ हजार २०५ रुपये किंंमतीचे ३३२.६८० ग्रँम वजनाचे सोने दान आले आहे. ४ लाख ५० हजार ५४६ रुपये किंमतीचे ७ हजार ६७३ ग्रँम वजनाची चांदी दान आली आहे. ११ लाख २० हजार २२६ रुपये परकीय चलन प्राप्त झाले आहे.असे एकूण ४ कोटी ५७ लाख ९१ हजार १८७ रुपयांचे घसघशीत दान श्री साईसंस्थानच्या दानपेटीत जमा झाले असल्याची माहिती ना.काळे यांनी दिली.

शासनाने करोना संदर्भातील नियम अटीशर्ती शिथिल केल्यानंतर श्री साईबाबा विश्वस्त व्यवस्थेच्या वतीने यंदाचा श्री रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात पारंपरिक पद्धतीने साजरा करण्याचे ठरविण्यात आले होते. यामध्ये शिर्डी ग्रामस्थ यांच्या वतीने अनेक उपक्रम राबविण्यात आले यामध्ये प्रामुख्याने ४० हजार स्के.फुटाची श्री साईबाबांची विश्वविक्रमी रांगोळी, साईकेसरी कुस्ती, फुड फेस्टिव्हल, मनोरंजनाचे कार्यक्रम, पालखी पदयात्रींना कपाळावर चंदनाचा टिळा, कावड यात्रीचे स्वागत, याबरोबरच साईसंस्थानच्या वतीने भाविकांना उन्हाचा त्रास जाणून नये यासाठी साईमंदीर परिसरात कारपेट टाकण्यात आले होते. ठिकठिकाणी पाण्याची व्यवस्था केली होती. तसेच पालखी पदयात्रीसाठी पिण्याच्या पाण्याचे टँकर पाठवण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

दि.१४ एप्रिल गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार सलग चार दिवस सुट्या आल्याने शिर्डीत भाविकांची गर्दी वाढत आहे. येणाऱ्या भाविकांसाठी उत्तम सोयी सुखसुविधा देण्यासाठी साईसंस्थान प्रशासन सज्ज आहे. गर्दीत भाविकांनी साईंच्या दर्शनासाठी जातांना एकोप्याने जावे, स्वताबरोबर आपल्या कुटुंबातील सदस्यांची देखील काळजी घ्यावी. काही अनुचित प्रकार आढळून आल्यास साईसंस्थानच्या सुरक्षा कर्मचारी तसेच प्रशासनास कळवावे असे मी यानिमित्ताने आवाहन करतो.

ना.आशुतोष काळे (अध्यक्ष श्री साईबाबा संस्थान, शिर्डी)

रामनवमी उत्सवात साईंच्या चरणी साडेचार कोटींचं दान!
११ मान्यवरांचा 'साईरत्न पुरस्कार' देऊन सन्मान, पहा कोणाकोणाला मिळाला पुरस्कार

Related Stories

No stories found.