शिर्डी (प्रतिनिधी) -

पदवी प्रवेशासाठी लागणारी फी म्हणून 5 लाख रुपये ऑनलाईन भरणा केलेले होते. परंतु सदर दलाल याने सदरची फी म्हणून घेतलेली रक्कम ही सदर युनिव्हर्सिटी मध्ये भरण्यास टाळाटाळ केली व सदर रकमेचा

स्वतःचे फायद्यासाठी अपहार केला. याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासात पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी करत सदर मुलीचे 5 लाख रुपये परत मिळवून तिचे शैक्षणिक नुकसान टाळले.

शिर्डी येथील मुलगी पूजा सुभाष कोतकर ही किर्गीझस्थानमधील युनिव्हर्सिटी बिस्केक येथे वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासाठी कोटकासीम जि.अलवर, राजस्थान येथील दलाल सुनिलकुमार रामानंद यादव रा. कोटकासीम जि.अलवर, राजस्थान याचेमार्फत 2018 मध्ये प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतलेला होता. सदर पदवीसाठी फिर्यादीचे वडील सुभाष श्यामराव कोतकर यांनी सदर दलाल याच अकौंटवर पदवी प्रवेशासाठी लागणारी फी म्हणून 5 लाख रुपये ऑनलाईन भरणा केलेले होते. परंतु सदर दलाल याने सदरची फी म्हणून घेतलेली रक्कम ही सदर युनिव्हर्सिटी मध्ये भरण्यास टाळाटाळ केली व सदर रकमेचा स्वतःचे फायद्यासाठी अपहार केला.

याप्रकरणी शिर्डी येथील पूजा सुभाष कोतकर या विद्यार्थिनीने शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी भा.दं. वि.कलम 420,406 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर मुलीचे पालकांची सर्वसाधारण परिस्थिती असून देखील आर्थिक अडचण सोसून त्यांनी त्यांचे मुलीला उच्च शिक्षण देवून डॉक्टर बनविण्याचा ध्यास घेतला परंतु दलालाने फसवणूक केल्याने मुलीच्या शिक्षणाचा यक्ष प्रश्न निर्माण झाला व पुढील शिक्षणावर पाणी सोडण्याची वेळ आली होती. सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील व अपर पोलीस अधीक्षक, डॉ. दिपाली काळे यांचे मार्गदर्शनाखाली व शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांच्या सुचनांप्रमाणे शिर्डीचे पोलीस निरीक्षक प्रविण लोखंडे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण दातरे, पोलीस कॉन्स्टेबल गोकुळ पळसे, पोलीस कॉन्स्टेबल रिझवान शेख यांचे पथक नेमून सदर पथकातील अधिकारी व कर्मचारी यांना कोटकासीम जि.अलवर, राजस्थान येथे जावून तांत्रिक पद्धतीने या दलालाचा शोध घेवून त्याकडे गुन्ह्याचे अनुषंगाने योग्य ती चौकशी केली असता आरोपी सुनिल यादव याने फिर्यादी यांचे वडील यांचेशी संपर्क साधून सदर गुन्ह्यातील फसवणूक रक्कम रोख स्वरुपात परत देण्याची तयारी दर्शविल्याने फिर्यादी व आरोपी यांचेत समझोता होवून फिर्यादी यांना त्यांची 5 लाख रुपयांची रक्कम पूर्णपणे परत मिळाल्याने फिर्यादी यांचे मोठे शैक्षणिक नुकसान टळले आहे. अशा प्रकारची विद्यार्थ्यांची फसवणूक झालेली असेल तर त्यांनी तात्काळ शिर्डी पोलीसांशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.