शिर्डी पोलिसाच्या कारवाईत 10 दिवसांत दीड लाखांचा दंड वसूल

शिर्डी पोलिसाच्या कारवाईत 10 दिवसांत दीड लाखांचा दंड वसूल

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

करोना महामारीच्या धर्तीवर शिर्डी पोलिसांच्यावतीने वीना मास्क नियमाचे उल्लंघन करणारे तसेच आस्थापना यांच्यावर जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील व उपविभागीय अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम राबविण्यात आली होती. गेल्या दहा दिवसात पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या विशेष पथकाने केलेल्या कठोर कारवाईने जवळपास दीड लाख रुपये दंड करण्यात आला आहे, अशी माहिती माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण दातरे यांनी दिली.

शिर्डी शहरात लॉकडाउन व संचारबंदी धरतीवर शासकीय नियमांचे उल्लंघन करणार्‍या लोकांच्या विरोधात विशेष मोहीम सुरू आहे. त्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली होती. त्या माध्यमातून जवळपास दहा दिवसात दीड लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. जे नागरिक शासकीय आदेशाचे उल्लंघन करतील अशा नागरिकांवर या पुढील काळातही अशाच प्रकारचे कारवाई सुरू राहणार आहे, असे सांगून नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये.

दुचाकी वाहन धारकांनी देखील विनामास्क फिरताना आढळून आल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. करोना महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर वाढत असलेल्या रुग्णाच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून घराबाहेर पडू नये, असे आवाहन वेळोवेळी पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

असे असतानाही काही लोक हेतुपुरस्सरपणे आरोग्याची काळजी न घेता शासकीय नियमांचे उल्लंघन करताना दिसून येत आहे. त्या धर्तीवर यापुढील काळात आणखी कठोर कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक गंथाले, पोलीस उपनिरीक्षक बारकु जाणे, वैभव रुपवते, महिला पोलिस निरीक्षक सुरेखा देवरे आदींसह पोलीस कर्मचारी यांनी कारवाईत भाग घेतला.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com