शिर्डीचे विमान उतरले थेट मुंबई विमानतळावर

शिर्डीचे विमान उतरले थेट मुंबई विमानतळावर

- काय होते कारण ?

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

चेन्नई (Chennai) येथून शिर्डीसाठी (Shirdi) आलेले स्पाइस जेटचे विमान (Spice Jet Aircraft) बुधवार दि. 13 रोजी शिर्डी विमानतळावर (Shirdi Airport) कमी दृष्यमानतेच्या (Low visibility) कारणास्तव थेट मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) उतरवण्यात आले असून या निर्णयामुळे चेन्नईहून (Chennai) श्री साईबाबांच्या दर्शनासाठी (Shri Sai baba Darshan) निघालेल्या 126 भाविकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आहे. कमी दृश्यमानतेमुळे (Low visibility) हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिर्डी विमानतळाचे व्यवस्थापक सुशील कुमार श्रीवास्तव (Shirdi Airport Manager Sushil Kumar Srivastava) यांनी दिली.

दरम्यान घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातील सर्व धार्मिक तिर्थस्थळे सरकारने दर्शनासाठी खुली करुन दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर साईसंस्थानचे साईमंदीर (Sai Baba Temple) दि. 7 ऑक्टोबरपासुन भाविकांसाठी खुले केले आहे. त्यामुळे शिर्डी विमानतळ (Shirdi Airport) 10 ऑक्टोंबर रोजी सुरू झाल्यानंतर काल बुधवारी दि. 13 रोजी चेन्नईहुन आलेले स्पाईसजेटचे विमान (Spice Jet Aircraft) कमी दृश्यमानतेमुळे मुंबई विमानतळावर उतरवण्यात (Landing at Mumbai Airport) आले. या विमानात 126 प्रवासी होते.

विमान लँडिंग (Aircraft Landing) करण्यासाठी पाच हजार मीटरपर्यंत दृश्यमानता (visibility)) आवश्यक असते. मात्र बुधवारी ढगाळ वातावरणामुळे (Cloudy) शिर्डी विमानतळावर चार हजार मीटर पर्यंतच दृश्यमानता असल्याने बराच वेळ आकाशात घिरट्या घातल्यानंतर वैमानिकाने अखेर मुंबई विमानतळावर विमान लँडिंग करण्याचा निर्णय घेतला. करोनाच्या पार्श्वभूमीवर साईमंदीरात ऑनलाइन पास बुकिंग केल्यानंतरच भाविकांना मंदिरात दर्शनासाठी प्रवेश दिला जात आहे.

विमान मुंबईला लँडीग करावे लागल्याने या विमानाने आलेल्या साईभक्तांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. आँनलाईन दर्शनासाठी बुधवारची वेळ निर्धारित झालेल्या अनेक साईभक्तांना दर्शनापासून वंचित राहावे लागले. तर काहींवर पुन्हा पास काढण्याची नामुष्की ओढवली आहे. शिर्डीहून चेन्नई (Shirdi Chennai) साठी तिकीट बूक (Ticket Book) केलेल्या प्रवाशांना देखील मोठा मनस्ताप सहन करत विमानतळावरून माघारी परतावे लागले. यापूर्वी देखील अनेकदा शिर्डी विमानतळावर (Shirdi Airport) कमी दृश्यमानतेमुळे विमान सेवेत बाधा आल्याच्या घटना घडल्या आहेत.

याठिकाणी नाईट लँडिंगसाठी (Night Landing) यंत्रणा उभी करण्याचे काम धिम्या गतीने सुरू असून हे काम पूर्ण झाल्यानंतरच हा प्रश्न कायमचा सुटेल तोपर्यंत तरी शिर्डी विमानतळावर दृश्यमानताचे ग्रहण कायम राहील.

Related Stories

No stories found.