
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
रामनवमी यात्रे दरम्यान पाळणा दुर्घटनेतील जखमी झालेल्या किशोर साळवेंची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली त्यांनी नाशिक येथील हॉस्पिटलमध्ये गुरुवारी पहाटे अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने शिर्डी परिसरावर शोककळा पसरली आहे.
30 मार्च रोजी शिर्डी येथे रामनवमी उत्सवानिमित्त शिर्डीत विविध प्रकारचे पाळणे दाखल झाले होते. शिडी रामनवमी यात्रेला विशेष महत्त्व असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणे परिसरातील नागरिक व भाविक यात्रा पाहण्यासाठी गर्दी करतात तसेच नागरीऊ आपल्या कुटुंबासमवेत या यात्रेचा आनंद घेण्याकरिता येतात अशाच प्रकारे 1 एप्रिल रोजी सायंकाळी शिर्डीत राहणारे किशोर पोपट साळवे वय (35) हे आपल्या पत्नी ज्योती साळवे व त्यांची मुलगी यात्रेत पाळण्यात आनंद घेण्यासाठी आले होते.
परंतु दुर्दैवाने अचानकपणे ब्रेक डान्स करणार्या पाळण्याची दुर्घटना घडून या दोन्ही दांपत्यांना यात मोठी इजा झाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तात्काळ स्थानिक ग्रामस्थांनी त्यांना साईबाबा सुपर हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले परंतु किशोर साळवे यांच्या दोन्ही पायाला तसेच त्यांची पत्नी ज्योती यांच्या एका पायाला मोठ्या प्रमाणात जखम होऊन रक्तस्राव होत असल्यामुळे त्यांना नाशिक येथील अशोका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथील डॉक्टरांनी तात्काळ त्यांच्यावर उपचार सुरू करून या पाळणा दुर्घटनेत त्यांचे दोन्ही निकामी झालेले पाय तात्काळ शस्त्रक्रिया करून काढून टाकले व त्यांना जीवदान देण्याचा प्रयत्न केला.
तसेच त्यांच्या पत्नी ज्योती यांच्या एका पायाचा पंजा शस्त्रक्रिया करून काढण्यात आला त्यांच्या पायावर देखील दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक असल्यामुळे शिर्डी शहरातील स्थानिक ग्रामस्थ तसेच विविध संघटनेने त्यांना आर्थिक मदतीचा हात दिला तसेच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री सहायता निधीतून जवळपास 22 लाख रुपये हॉस्पिटलचे बिल माफ करण्यासाठी प्रयत्न केले. परंतु दुर्दैवाने 27 एप्रिल गुरुवार रोजी पहाटे त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. त्यांची निधनाची वार्ता शिर्डी परिसरात समजतात नागरिकांनी या घटनेची मोठी हळद व्यक्त केली.
शिर्डी येथील पाळणा दुर्घटनाची सर्वस्व जबाबदारी ही पाळणा मालकाची असून शासनाने या लक्ष घालून या दुर्घटनेस जबाबदार असलेल्या पाळणा मालकाकडून 25 लाखांची आर्थिक मदत साळवे कुटुंबियांना मिळून द्यावी.
- कमलाकर कोते शिवसेना जिल्हाध्यक्ष)