शिर्डीत ऑक्सिजन प्रकल्प अन् आरटीपीसीआर लॅब

साईबाबा संस्थान समितीची मान्यता
शिर्डीत ऑक्सिजन प्रकल्प अन् आरटीपीसीआर लॅब

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

करोना महामारीत सर्वसामान्य गोरगरीब लोकांना चांगली आरोग्य सेवा मिळावी, यासाठी साईबाबा संस्थान अ‍ॅक्शन मोडमध्ये असून

ऑक्सिजन प्लँटच्या निर्मितीबरोबरच करोना लॅब आणि रेमडेसिवीर इंजेक्शनची व्यवस्था आठ दिवसांत करण्याच्यादृष्टीने साईसंस्थान प्रशासन कामाला लागले आहे

करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे सर्वत्र हाहा:कार उडाला असून रुग्णांना ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नसल्याने मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे कोव्हिड सेंटरची निर्मिती करून सध्या मसूरी येथे प्रशिक्षणासाठी गेले असल्याने संस्थानचा कारभार रवींद्र ठाकरे यांच्याकडे आहे. रुग्णांना साईसंस्थानच्या आरोग्य विभागात ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सेवेचा मोठा लाभ होत असून त्यांनी ऑक्सिजन प्लँट आणि आरटीपीसीआर लॅबसाठी पावले उचलली आहेत.

सध्या वडगावे यांची संपूर्ण वैद्यकीय टीम इंजेक्शनचा मोठा तुटवडा असतानाही प्रशासन आणि रुग्णांच्या सेवेत कार्यरत आहे. नातेवाईकांची डोकेदुखी वाढली असल्याने मसुरी येथे प्रशिक्षणासाठी असलेल्या बगाटे यांनी राज्यातील कोव्हिड रुग्णांसाठी काही वॉर्ड व केंद्रासाठी काही वॉर्ड आरक्षित केले आहेत. तसेच उच्चपदस्थ अधिकार्‍यांशी अत्याधुनिक उपचारांसाठी संपर्क साधत शिर्डी येथील मेडिकल संचालक डॉ. प्रितम अहोरात्र करोना रुग्णांच्या सेवेत आहेत.

साईसंस्थानच्या साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयात भव्य ऑक्सिजन प्लँटची येत्या आठ दिवसांत उभारणी करण्याचा प्रयत्न सुरू केला असून साईसंस्थानच्या रुग्णालयातच करोना चाचणीच्या लॅबचीही निर्मिती करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होण्याच्या दृष्टाने आपण वरिष्ठ पातळीवर संपर्कात असुन येत्या आठ दिवसात ऑक्सिजन प्लॅट, कोरोना टेस्टिंग लॅबची उभारणी करण्याच्या दृष्टीने आपला प्रयत्न असल्याचे साईबाबा संस्थान मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी सांगितले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com