
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
शिर्डी विमानतळावर (Shirdi Airport) आता रात्रीच्या वेळी विमान (Plane) उतरू शकणार आहे. शिर्डी विमानतळावरील विमानांच्या नाईट लॅंडिंगला (Night Landing of Planes) गुरुवारी डीजीसीएकडून (DGCA) परवाना प्राप्त झाला आहे. शिर्डीला नाईट लँडिंगचा (Night Landing) परवाना दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि नागरी उड्डयण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (Civil Aviation Minister Jyotiraditya Shinde) यांचे आभार मानले आहेत.
शिर्डीसाठी (Shirdi) ही गेल्या दोन महिन्यांतील तिसरी आनंदाची बातमी आहे. नागपूर (Nagpur) ते शिर्डी (Shirdi) हा समृद्धी महामार्ग (Samrudhi Highway) पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते खुला झाला. त्यापाठोपाठ मुंबई (Mumbai) ते शिर्डी अशी वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) सुरू झाली आणि आता नाईट लँडिंगची सवलत प्राप्त झाल्याने पहाटेच्या काकडआरतीला उपस्थित राहू इच्छिणार्यांना रात्री प्रवास करुन येता येणार आहे. एकूणच भाविकांना मोठ्या सुविधा यामुळे निर्माण होणार आहेत, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
शिर्डी विमानतळाला नाईट लँडिंगचा परवाना मिळावा म्हणून गेल्या काही महिन्यापासून प्रशासकीय पातळीवर सातत्याने पाठपुरावा होत होता. फडणवीस यांनी ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Shinde) यांच्याकडे तातडीने हा परवाना देण्याबाबत आग्रह धरला होता आणि आज सकाळी डीजीसीएकडून हा परवाना प्राप्त झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्राने आणखी एक भर विकासात घातली आहे. शिर्डी विमानतळ (Shirdi Airport) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या कार्यकाळात २०१७ मध्ये सुरु झाले होते.
या परवान्यामुळे शिर्डी यात्रा तर सुलभ होईलच शिवाय या परिसराच्या विकासाला सुद्धा गती प्राप्त होणार आहे, असा विश्वास फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केला आहे. शिर्डीत भाविकांच्या संख्येत सुद्धा मोठी वाढ यामुळे अपेक्षित असून, त्यामुळे स्थानिक अर्थकारणाला गती प्राप्त होईल. उर्वरित प्रक्रिया पूर्ण करुन, विमानांचे उन्हाळी वेळापत्रक लागू होईल तेव्हा साधारणत: मार्च-एप्रिलपासून आता रात्रीचीही विमानसेवा प्रारंभ होईल. सध्या शिर्डीला 13 विमानसेवा आहेत.