शिर्डीत साईभक्तांची फसवणूक! साई संस्थानच्या 'त्या' कर्मचाऱ्यविरोधात गुन्हा दाखल

शिर्डीत साईभक्तांची फसवणूक! साई संस्थानच्या 'त्या' कर्मचाऱ्यविरोधात गुन्हा दाखल

शिर्डी | Shirdi

देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांच्या शिर्डीत दररोज हजारो साईभक्त येत असतात. दर्शनासह साईंच्या झोळीत दान ही टाकतात.

मात्र, याच दानात अपहार झाल्याचा गुन्हा साईबाबा संस्थांनने दाखल केल्यानतर एकच खळबळ उडाली आहे. साई भक्ताने दिलेल्या देणगीपोटी बनावट पावती देऊन देणगीदारासह साईबाबा संस्थानची फसवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यावर शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी साईबाबा (Sai baba Sansthan) संस्थानला एक निनावी पत्र प्राप्त झाले होते. या पत्रात देणगी कक्षात कामावर असलेला एक कंत्राटी कर्मचारी देणगीदारांना दिलेल्या रकमेच्या दोन भाग करून पावत्या देतोय आणि त्यातील एक बनावट असते. बनावट पावतीची संस्थानाकडे नोंद होत नाही. त्या रकमेचा अपहार केला जातो, असे नमूद केले होते.

साईबाबा संस्थानने याबाबत चौकशी केली असता या प्रकरणात तथ्य असल्याचे समोर आले. देणगी कक्षात कंत्राटी कामावर असलेल्या दशरथ चासकर या कर्मचाऱ्याने अपहार केल्याचा प्रकार चौकशीत उघड झाला. या प्रकरणी साईबाबा संस्थानचे प्रभारी लेखा अधिकारी कैलास खराडे यांच्या फिर्यादीवरून कंत्राटी कर्मचारी दशरथ चासकर याच्या विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com