शिर्डी नगरपंचायत सदस्य आरक्षण सोडत जाहीर

शिर्डी नगरपंचायत सदस्य आरक्षण सोडत जाहीर

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

आगामी शिर्डी नगरपंचायत निवडणुकीसाठी सदस्य पदांचा आरक्षण सोडत कार्यक्रम काढण्यात आला असून या सोडतीमध्ये जवळपास सर्वच ठिकाणी आरक्षणात बदल झाल्याने विद्यमान नगरसेवकांसह इच्छुकांमध्ये कही खुशी कही गम असेच वातावरण निर्माण झाले आहे.

शुक्रवार दि. 12 नोव्हेंबर रोजी शिर्डी नगरपंचायतच्या सभागृहात शिर्डी उपविभागीय कार्यालयाच्या प्रांताधिकारी गोविंद शिंदे, मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, उपनगराध्यक्ष हरिश्चंद्र कोते तसेच नगरसेवक व नागरिकांच्या प्रमुख उपस्थितीत 17 प्रभागांसाठी आरक्षणाची सोडत काढण्यात आली. प्रभागनिहाय काढण्यात आलेली सोडत पुढीलप्रमाणे आहे.

प्रभाग क्रमांक 1 मध्ये सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 2 मध्ये सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 3 सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 4 सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 5 नागरिकांचा मागास प्रवर्ग, प्रभाग क्रमांक 6 अनुसूचित जाती महिला, प्रभाग क्रमांक 7 अनुसूचित जाती महिला, प्रभाग क्रमांक 8 नागरिकांचा मागास प्रवर्ग, प्रभाग क्रमांक 9 सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 10 नागरिकाचा मागास प्रवर्ग महिला, प्रभाग क्रमांक 11 अनुसूचित जाती, प्रभाग क्रमांक 12 अनुसूचित जमाती, प्रभाग क्रमांक 13 सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 14 नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, प्रभाग क्रमांक 15 सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 16 सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 17 सर्वसाधारण यानुसार आरक्षणाची सोडत निघाली आहे. या सोडतीवर 16 नोव्हेंबर 2021 पर्यंत हरकती व सूचना मागवण्याचा कालावधी आहे.

Related Stories

No stories found.