बहिष्कारचा सर्वपक्षियांचा निर्णयानंतरही काही व्यक्तींकडून जाणीवपूर्वक छेद देण्याचा प्रयत्न

या विकृती प्रवृत्तींना वेळीच लगाम घालावा लागेल; सर्वपक्षिय नेत्यांचा संताप
बहिष्कारचा सर्वपक्षियांचा निर्णयानंतरही काही व्यक्तींकडून जाणीवपूर्वक छेद देण्याचा प्रयत्न

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

शिर्डी नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय वर्तुळात गोंधळ उडाला आहे. सर्वपक्षीय बैठकीत बहिष्काराचा निर्णय झाला असतांना त्यास काही व्यक्तींकडून जाणीवपूर्वक छेद देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या विकृती प्रवृत्तींना वेळीच लगाम घालावा लागेल असे आवाहन सर्वपक्षीय ग्रामस्थांच्या बैठकीत करण्यात आले असून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

2021 शिर्डी नगरपंचायतीच्या निवडणूकीवर शिर्डीतील सर्वपक्षीय ग्रामस्थांनी बहिष्कार घातला असतांना 17 प्रभागात 7 अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. त्यापार्श्वभुमीवर काल मंगळवार दि. 4 रोजी सकाळी सर्वपक्षीय ग्रामस्थांची बैठक पार पडली. यावेळी कैलासबापू कोते, दिगंबर शिवराम कोते, शिवाजी गोंदकर, महेंद्र शेळके, डॉ. एकनाथ गोंदकर, प्रताप जगताप, बाबासाहेब कोते, सुधाकर शिंदे, अभय शेळके, रमेश गोंदकर, कमलाकर कोते, सुजित गोंदकर, विजय जगताप, सचिन शिंदे, अशोक खंडू कोते, निलेश कोते, मंगेश त्रिभुवन, रवींद्र गोंदकर, राजेंद्र गोंदकर, उत्तम कोते, बाळासाहेब गोंदकर, प्रमोद गोंदकर, गजानन शेर्वेकर, अरविंद कोते, दत्ता गोविंदराव कोते, सुधीर शिंदे, देवानंद शेजवळ, गणेश दिनूमामा कोते, राहुल गोंदकर, सुनील गोंदकर, वेणुनाथ गोंदकर, दिपक वारूळे, दत्तात्रय कोते, श्री भडांगे, अविनाश शेजवळ, सलीम शेख, अमोल बानाईत, समीर शेख, गोविंद कोते, विक्रांत वाकचौरे, सोमनाथ कावळे,उमेश शेजवळ, दत्ता आसने, नितीन अशोक कोते, अमोल सुपेकर, प्रकाश गोंदकर आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.

निलेश कोते यांनी सांगितले की, गांवात कोणीही जातीपातीचे राजकारण करू नका, सर्वधर्मसमभावाचे प्रतिक असलेल्या शिर्डी गांवात बाबांच्या शिकवणीनुसार आचरण करावे. वेळोवेळी गांवाच्या भल्यासाठी सर्वपक्षाचे नेत्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अशोक कोते म्हणाले की, काँग्रेसचे सर्व पदाधिकारी या बैठकीला उपस्थित आहे त्यामुळे ज्या लोकांनी अर्ज दाखल केले आहे त्यांचे राजीनामे घेण्यासाठी आमची आग्रही भूमिका राहाणार असल्याचे त्यांनी सांगितले.कमलाकर कोते यांनी सांगितले की, गावांला एक परंपरा लाभली आहे. शिर्डी नगरपरीषद होण्यासाठी महाविकास आघाडीच्या सर्व जेष्ठ नेत्यांचे योगदान आहे.

अभय शेळके यांनी म्हटले की, एखाद्याला नांदायचे असेल तर तो वेगवेगळी भुमिका घेणार आहे. छोटीशी चुक आयुष्यभर सोसावी लागेल याचे भान ठेवून एकसंघ राहिलेल्या शिर्डीचा इतिहास आताच्या पिढीने विसरता कामा नये असे मत माजी सरपंच दिगंबर कोते यांनी व्यक्त केले. गांवाच्या हितासाठी शिर्डीची नगरपरीषद कशी होईल यासाठी आपण सर्वानी आग्रही भूमिका घ्यावी असे आवाहन कैलासबापू कोते यांनी केले. डॉ एकनाथ गोंदकर यांनी सांगितले की, ही घटना अतिशय अशोभनीय आहे. सदरचे उमेदवार काँग्रेस पक्षाचे नाही.आम्ही सर्व गांवाबरोबर आहोत अशी आमच्या काँग्रेस पक्षाची भुमिका आहे. माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी सांगितले की गावाने या निवडणुकीत बहिष्काराचा निर्णय घेतला आहे, गावच्या भुमिकेबरोबर राहाणे महत्त्वाचे आहे. गांवच्या भुमिकेला कलंक लावण्याचे काम जो कोणी करत असेल त्याचा निषेध करतो. नगरपरिषदेची प्रक्रिया सुरू आहे, ती कुठल्याही परिस्थितीत थांबणार नाही. हा केलेला प्रयत्न बालीश बुध्दीचा आहे. या लोकांना महत्त्व न देता आपले काम सुरू ठेवावे, शासन स्तरावर आपल्याला नगरपरिषद करायची आहे यावर आपण सर्व ठाम आहे.

यावेळी सुजित गोंदकर, मंगेश त्रिभुवन, रवींद्र गोंदकर, विक्रांत वाकचौरे, अँड अनिल शेजवळ,अँड अविनाश शेजवळ,अमोल बानाईत, दत्तात्रय कोते, दत्ता आसणे,अशोक कोते,सचिन शिंदे,रमेश गोंदकर आदींनी मनोगत व्यक्त करत अर्ज भरलेल्या उमेदवारांचा जाहीर निषेध करून शिर्डी निवडणुकीवर टाकलेला बहिष्कार कायम ठेवला.

2021 शिर्डी नगरपंचायतीच्या या निवडणुकीत 191 उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरले होते. यामध्ये आमच्याही पक्षाच्या लोकांनी अर्ज भरले होते. परंतु गांवच्या हितासाठी सर्वपक्षीय बहिष्कार टाकण्यात आला असल्याने आम्ही तटस्थ भुमिका घेऊन गांवाबरोबर राहिलो. काल काँग्रेसच्या उमेदवारांबरोबर विधानसभेचा उमेदवार उपस्थित होता त्यामुळे यामध्ये महाविकास आघाडीचा हाथ आहे का? ओबीसी आरक्षण पूर्ववत होत नाही तोपर्यंत निवडणूक नको अशी भूमिका महाआघाडी सरकारने घेतली आणि काँग्रेसचे पदाधिकारी अर्ज भरतात हा ओबीसी समाजावर अन्याय आहे.

- सचिन शिंदे, शिर्डी शहराध्यक्ष भाजप

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com