शिर्डी नगरपंचायत निवडणूक; राष्ट्रवादी स्वबळाच्या वाटेवर : रमेश गोंदकर
शिर्डी

शिर्डी नगरपंचायत निवडणूक; राष्ट्रवादी स्वबळाच्या वाटेवर : रमेश गोंदकर

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा (Nationalist Congress Party) 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण या धोरणानुसार आपण शिर्डी (Shirdi) शहरात काम करत असून नगरपंचायत निवडणुका (Nagar panchayat Election) तोंडावर आलेल्या आहेत. आपण सर्वजण सर्व वॉर्डांमध्ये तयारीला लागून शिर्डीचा (Shirdi) विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (Nationalist Congress Party) जास्तीत जास्त संख्येने नगरसेवक निवडून आणता येईल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे स्पष्ट करून पक्षाच्यावतीने स्वबळावर निवडणुका (Elections on their own) लढवण्याच्या वाटेवर असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रमेश गोंदकर (NCP leader Ramesh Gondkar) यांनी सांगितले.

शिर्डी (Shirdi) येथील स्व. गणपतराव शेळके पाटील सभागृहात शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बैैठकीत हा नारा देण्यात आला. अध्यक्षस्थानी गौतम बँकेचे चेअरमन बाबासाहेब कोते, शिर्डी शहराध्यक्ष महेंद्र शेळके, निलेश कोते, युवक तालुकाध्यक्ष संदीप सोनवणे, उपाध्यक्ष सुधाकर शिंदे, अमित शेळके, चंद्रकांत गोंदकर, रा.यु.काँ.चे उपजिल्हाध्यक्ष राकेश कोते, सुनील गोंदकर, दीपक गोंदकर, विशाल कोते, गणेश गोंदकर, रा.यु.काँ.चे शहराध्यक्ष विशाल भडांगे, राहुल कुलकर्णी, सईद शेख, साई कोतकर, भागवत कोते, अजित जगताप, शायद सय्यद, लखन वाकचौरे, राहुल फुंदे, युनूस शेख आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी सुधाकर शिंदे यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना केल्या. शहराध्यक्ष महेंद्र शेळके यांनी सांगितले, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने (Nationalist Congress Party) सर्व वॉर्डांमध्ये उमेदवार देऊन जास्तीत जास्त संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (Nationalist Congress Party) नगरसेवक सभागृहात पाठवण्याचा प्रयत्न करणार असून त्यासाठी आम्ही पक्षातून युवकांना जास्तीत जास्त संधी देणार आहोत.

निलेश कोते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस हे शिर्डी शहरासाठी गेल्या वीस वर्षापासून कार्य करीत असूूून शिर्डी (Shirdi) शहराचा उपनगराध्यक्ष असताना शिर्डी शहरातील विकास कामे करण्याची संधी पदाच्या माध्यमातून भेटली. या काळामध्ये शहराच्या जडणघडणीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा (Nationalist Congress Party) सिंहाचा वाटा आहे.

अमित शेळके म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने वेळोवेळी नगरपंचायतीच्या जाचक घरपट्टी, नळपट्टी विविध समस्यांंबाबत आंदोलन करून शिर्डीच्या नागरिकांना न्याय मिळवून दिला आहे. त्याचबरोबर शिर्डी शहरातील अनेक विकास कामांना कशी गती देता येईल व कसे ते लवकरात लवकर पूर्ण करता येतील यासाठी सदैव प्रयत्न केलेला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com