शिर्डीत काँग्रेसचे आणखी तीन उमेदवार बिनविरोध

प्रभाग 5 मध्ये कोण माघार घेणार याकडे नजरा
शिर्डीत काँग्रेसचे आणखी तीन उमेदवार बिनविरोध

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

2021 शिर्डी नगरपंचायत निवडणुक दरम्यान सतरा प्रभागातील चार ओबीसी आरक्षित जागांंवर खुल्या प्रवर्ग झाल्यानंतर या चार जागांसाठी होणार्‍या निवडणुकीसाठी काँग्रेसच्या पाच उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. काल मंगळवारी दुपारी छाननी दरम्यान पाचही उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे यांनी दिली.

दरम्यान शिर्डी नगरपंचायतच्या सतरा प्रभागातील ओबीसी आरक्षित असलेल्या चार जागा खुल्या प्रवर्ग झाल्याने या चार जागांसाठी दि.18 जानेवारी 2022 रोजी मतदान प्रक्रिया होणार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. परंतु शिर्डी सर्वपक्षीय ग्रामस्थांनी या चार जागेवर कोणीही अर्ज भरणार नाही म्हणून पुन्हा बहिष्कार टाकला होता. मात्र ग्रामस्थांच्या बहिष्काराला झुगारून काँग्रेसच्या पाच उमेदवारांनी शेवटच्या क्षणी आपले अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. या पाच अर्जाची छाननी शिर्डी नगरपंचायतचे निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे आणी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी काल दि. 4 रोजी केली असून हे सर्व पाचही अर्ज वैध ठरले असल्याचे त्यांनी सांगितले.

यामध्ये प्रभाग क्रमांक 5 मध्ये सुनिता राजेंद्र बर्डे व अर्चना अमृत गायके या दोन महिला उमेदवारांनी अर्ज भरल्याने यामधून कोण माघार घेणार याकडे सर्वाचे लक्ष राहाणार आहे.तर प्रभाग क्रमांक 8 मध्ये प्रसाद प्रकाश शेळके, प्रभाग क्रमांक 10 मध्ये आरती संभाजी चौगुले, प्रभाग क्रमांक 14 मध्ये संभाजी नानासाहेब चौगुले यांचे अर्ज दाखल आहे. त्यामुळे या उमेदवारांच्या घोषणेच्या निवडीची केवळ औपचारिकता बाकी आहे. प्रभाग क्रमांक 5 मधून एक अर्ज मागे घेतल्यास पहिले हे दोन आणि हे चार असे एकूण सहा अपक्ष उमेदवार बिनविरोध होतील.परंतु यासाठी अजून सहा दिवस वाट पहावी लागणार आहे.अर्ज माघार घेण्याची तारीख 10 जानेवारी असल्याने तोपर्यंत राजकीय वर्तुळात काय घडामोडी घडतात हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com