शिर्डीत 4 जागांसाठी 5 अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

शिर्डीत 4 जागांसाठी 5 अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

शिर्डी नगरपंचायत निवडणूक 2021 मधील 17 वॉर्डातील चार जागांवरील ओबीसी आरक्षण रद्द करून त्या ठिकाणी खुल्या प्रवर्गातून निवडणूक घेण्याची घोषणा निवडणूक आयोगाने केली. त्या अनुषंगाने 18 जानेवारी रोजी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली असून या चार जागांसाठी काल दि. 3 रोजी नामनिर्देशन भरण्याची अंतिम मुदत असल्याने या चार जागेवर पाच अपक्ष उमेदवारांनी अर्ज भरले असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी दिली. शिर्डी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संभाजी चौगुले यांनी अपक्ष अर्ज दाखल केल्यानंतर शिर्डीच्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेचा उधाण आले आहे.

शिर्डीत 4 जागांसाठी 5 अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल
हॉटेलमध्ये काम करणारा तरुण आता 25 कोटींचा झाला मालक

शिर्डी नगरपंचायत निवडणुकीत आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वपक्षीय शिर्डी ग्रामस्थांनी बहिष्कार टाकला आहे. त्यानंतर साई संस्थानचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांच्याबरोबर शिर्डी ग्रामस्थांचे एक शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी मुंबईला रवाना झाले होते. त्यांच्या भेटीनंतर सदरील प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारने दि. 2 डिसेंबर रोजी शिर्डी नगरपरीषदेचा अध्यादेश सूचना जारी केला आहे. परंतु दि. 21 डिसेंबर 2021 रोजी होणार्‍या शिर्डी नगरपंचायतच्या निवडणुकीसाठी दि. 1 डिसेंबर ते 6 डिसेंबरपर्यंत कोणीही अर्ज भरला नव्हता. अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत दि. 7 डिसेंबर रोजी शिर्डी शहरातील माजी नगरसेवक सुरेश आरणे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून वॉर्ड क्रमांक 13 मधून तर त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. अनिता सुरेश आरणे यांनी वॉर्ड क्रमांक 1 मधून अर्ज दाखल केला होता.

शिर्डीत 4 जागांसाठी 5 अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल
पारनेर नगरपंचायतीच्या ४ जागांसाठी १८ उमेदवारांचे अर्ज दाखल

त्यामुळे दि.22 डिसेंबर रोजी मतमोजणीच्या दिवशी बिनविरोध निकाल जाहीर करणे अपेक्षित होते. सतरा वॉर्डातून या आरणे दाम्पत्यांंची उमेदवारांची बिनविरोध निवड होणार होती. परंतु प्रथम ओबीसी असलेल्या या चार जागेवरील आरक्षणाला न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे प्रभाग पाच, प्रभाग आठ, प्रभाग दहा व प्रभाग चौदा याठिकाणी खुला प्रवर्ग झाल्यावर निवडणूक आयोगाने या चार जागांसाठी दि. 18 जानेवारी 2022 रोजी निवडणूक घेण्याची घोषणा केली. त्यानुसार या खुल्या प्रवर्गातील चार जागांवर नामनिर्देशन फॉर्म भरण्यासाठी दि.29 डिसेंबर 2021 ते 3 जानेवारी 2022 दरम्यानचा कालावधी होता. या चार जागांवरही कोणीही उमेदवारी अर्ज भरू नये यासाठी सर्वपक्षीय शिर्डी ग्रामस्थांनी बैठक घेऊन पुन्हा बहिष्कार टाकला होता.

परंतु काल अर्ज भरण्याची अंतिम मुुुदत असल्याने प्रभाग क्रमांक 5 मध्ये सुनीता राजेंद्र बर्डे आणि अर्चना अमृत गायके, प्रभाग क्रमांक 8 मध्ये प्रसाद प्रकाश शेळके, प्रभाग क्रमांक 10 मध्ये आरती संभाजी चौगुले, प्रभाग क्रमांक 14 मध्ये संभाजी नानासाहेब चौगुले आदी पाच अपक्ष उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. या चार जागांवरील नामनिर्देशन फॉर्मची छाननी आज आहे. त्यामुळे यामधील पाच अर्जापैकी किती अर्ज वैध ठरतात याकडे सर्वांचे लक्ष वेधून आहे. दि. 10 जानेवारीला उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची तारीख आहे. त्यामुळे एकंदरितच पहिले दोन आणि आता चार जागांसाठी अशा एकूण सहा जागांवर अर्ज दाखल झाले आहेत. शिर्डी नगरपंचायतची नगरपरिषद होण्यासाठी राज्य शासनाने हरकती मागविण्यासाठी अधिसूचना जाहीर केली आहे. त्यासाठी 30 दिवसांच्या कालावधी जवळपास संपत आला आहे. त्यामुळे राज्यातील सर्व पक्षाच्या नेत्यांचे या निवडणुकीवर लक्ष केंद्रित झाले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com