शिर्डी नगर मार्गे मुंबई रेल्वे सुरु करण्याची मागणी

शिर्डी नगर मार्गे मुंबई रेल्वे सुरु करण्याची मागणी

शिरसगाव |वार्ताहर| Shirasgav

अनेक दिवसापासून शिर्डी पुणे मार्गे मुंबई (Shirdi Pune Mumbai) जाणारी फास्ट प्रवासी रेल्वे बंद (Fast passenger train closed) करण्यात आली असून आता करोना निर्बंध शिथिल (Corona restrictions relaxed) करण्यात आल्याने पूर्ववत बेलापूरला (Belapur) सायंकाळी 5 वाजता येणारी रोजची एक्स्प्रेस (Express) सुरु करावी, अशी मागणी शिरसगाव (Shirasgav) येथील श्रीरामपूर तालुका काँग्रेस चिटणीस इसाकभाई पठाण (Shrirampur Taluka Congress Secretary Isakbhai Pathan) यांनी केली आहे.

या गाडीने अनेक व्यापारी सकाळी पोहोचून दिवसभर कामे आटोपून रात्री 11 वाजता मुंबईहून निघून बेलापूर स्थानकात सकाळी 9.15 ला येत होते. आता सध्या साईनगर दादर एक्स्प्रेस क्रमांक 11042 आठवड्यातून श्रीरामपूर मार्गे बुधवार, गुरुवार, शुक्रवार व रविवारी शिर्डीहून रात्री 8.10 वाजता निघून दादरला सकाळी 6.35 ला पोहोचते. श्रीरामपूरला रात्री 8.10 वा. येते.चारच दिवस रेल्वे असल्याने व सध्या एसटी बसेस बंद असल्याने खाजगी बसेसने प्रवास करावा लागतो. त्यासाठी सुद्धा गाडीत जागा उपलब्ध नसल्याने तातडीचा प्रवास रद्द करावा लागतो.

शिर्डी दर्शन, श्रीरामपूर नगर येथे असणारी मोठी बाजारपेठ यामुळे रेल्वेला आर्थिक उत्पन्न जादा मिळणार असल्याने ती गाडी सुरु करणे गरजेचे आहे. बेलापूर येथे दुहेरी रेल्वेमार्ग झाला असून हे पूर्ण काम झाल्यावर वेळेचीही बचत होणार आहे. त्यामुळे पूर्वीची शिर्डी साईनगर येथून दुपारी 4.20 वाजता निघणारी व पुणे मार्गे रोजची गाडी पूर्ववत सुरु करावी, अशी मागणी पठाण यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com