शिर्डी-मुंबई धावणार वंदे भारत एक्सप्रेस

शिर्डी-मुंबई धावणार वंदे भारत एक्सप्रेस

मुंबई |प्रतिनिधी| Mumbai

पंतप्रधान मोदी फेब्रुवारीत मुंबई दौर्‍यावर येत आहेत. यावेळी ते साईनगर शिर्डी आणि सोलापूर (सिद्धेश्वर मंदिर) या धर्मिक स्थळांना जोडणार्‍या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवण्याची शक्यता आहे. 10 फेब्रुवारीला दुपारी 3 वाजता पंतप्रधानांनी झेंडा दाखवल्यावर उद्घाटनीय फेरी सीएसएमटी येथून शिर्डीसाठी आणि सोलापूरवरून मुंबईसाठी रवाना करण्याचे मध्य रेल्वेचे नियोजन आहे.

मुंबई-शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस नियमितपणे सीएसएमटीहून सकाळी 6.15 ला रवाना होणार असून, शिर्डीत दुपारी 12.10 ला पोहोचेल. परतीचा प्रवास सायंकाळी 5.25ला सुरू होईल आणि मुंबईत रात्री 11.18ला संपेल. नव्या गाडीने पाच तास 55 मिनिटांत प्रवास पूर्ण होईल.

मंगळवार वगळता उर्वरित दिवस शिर्डी वंदे भारत धावेल. कसारा घाटातून ही गाडी धावणार आहे.

थांबे : दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com