'OBC आरक्षण रद्द होण्यास केंद्रातील मोदी सरकार जबाबदार'

शिर्डीत काँग्रेसचे आंदोलन
'OBC आरक्षण रद्द होण्यास केंद्रातील मोदी सरकार जबाबदार'

शिर्डी | शहर प्रतिनिधी | Shirdi

आरक्षण, संविधान आणि लोकशाही संपवण्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (RSS) उद्देश असून संघाच्या इशा-यावर चालणारे केंद्रातील नरेंद्र मोदी (Narendra Modi) सरकार आरक्षण संपविण्यासाठीच काम करत आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्द्यावर वारंवार खोटे बोलून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया शिर्डी शहर काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष सचिन चौगुले (Shirdi City Congress Committee City President Sachin Chowgule) यांनी दिली.

दरम्यान आज शनिवार दि.२६ रोजी सकाळी शिर्डी (Shirdi) शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ओबीसी आरक्षणासंदर्भात काँग्रेस पक्षाच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले.यावेळी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉ.एकनाथ गोंदकर, पंकज लोंढे, सदाशिव गाडेकर, युंनुसभाई शेख, युवकचे शहराध्यक्ष अमृतराव गायके, सुरेश आरणे, मदन मोकाटे, नितीन सदाफळ, सचिन गाडेकर, मंगेश खाकाळे, अनुज गंगवाल, मोसिन सय्यद, आरबाज कादरी, संतोष वाघमारे, कृष्णा गायकवाड, कमलेश जाधव, राजू बरडे, स्वराज त्रिभुवन, मोहसीन खान, सागर कदम, विशाल बर्डे, शिवा भोंडगे, विजय पवार, अभिषेक वाघमारे, प्रवीण घोडेकर, डॉ.गोविंद भडांगे, संतोष दांडेकर, गणेश शेळके, सतीश म्हात्रे, अनिस शेख, उमेश शेजवळ, मुन्नाभाई सय्यद, असीम बेग, योगेश निरभावणे आदीसंह काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

याप्रसंगी बोलतांना चौगुले म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने देशातील ओबीसीची आकडेवारी केंद्र सरकारकडे मागितली होती.परंतु केंद्र सरकारने ही आकडेवारी सर्वोच्च न्यायालयास दिली नाही.त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण संपुष्टात आले असून केंद्र सरकारच्या ओबीसी विरोधी धोरणाचा निषेध म्हणून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी म्हणजेच सामाजिक न्याय दिनी काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्रातील भाजप सरकारविरोधात शिर्डी शहरात आंदोलन करण्यात आले आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांंना केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांना पत्र लिहून ओबीसींचा इम्पिरीकल डेटा देण्याची मागणी केली पण केंद्राने तो दिला नाही. केंद्राने ओबीसींचा डेटा दिला नसल्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केले. ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द होण्याला सध्याचे केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकारच जबाबदार आहे.ओबीसींचे हे राजकीय आरक्षण घालवून ओबीसी समाजाला सत्तेपासून वंचित ठेवण्याचा भाजपाचा डाव आहे.भाजपच्या या ओबीसीविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी आज काँग्रेस पक्षाच्या वतीने शिर्डी शहरात आंदोलन करण्यात आले.काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते कोविड नियमांचे पालन करून आंदोलनात सहभागी झाले होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com