‘दार उघड उद्धवा.. दार उघड...’ नारा देत शिर्डीत आंदोलन

जनतेच्या भावनेशी खेळू नका अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन करणार - आ. विखे
‘दार उघड उद्धवा.. दार उघड...’ नारा देत शिर्डीत आंदोलन

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

राज्यात मॉल तसेच मदिरालय उघडले मात्र कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेले मंदिरे, मस्जिद उघडण्यासाठी सरकारला योग्यता वाटत नसून

या बहिर्‍या, मुक्या, आंधळ्या सरकारला याचे कुठलेही भान राहिलेले नाही, किमान मंदिरे मस्जिद, प्रार्थनास्थळे खुली करून भक्तीभावाने लोकांना जाऊ द्या सरकारच्या सर्व नियमांचे पालन जनता काल, आजही आणि उद्याही करणार असून दार उघड उद्धवा दार उघड असा नारा देत टाळ मृदंगाच्या निनादात माजीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी साईबाबांना साकडे घातले असून सरकारने जागे होऊन तातडीने निर्णय घ्यावा तसेच जनतेच्या भावनेशी खेळू नका अन्यथा आम्हाला यापेक्षाही तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला.

शनिवार दिनांक 29 रोजी सकाळी 11 वाजेच्या दरम्यान शिर्डीत सर्वधर्म समभावाचे प्रतिक असलेल्या साईबाबांच्या मंदिरासमोर शिर्डी ग्रामस्थांच्या उपस्थितीत घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी आ. विखे पाटील बोलत होते.

याप्रसंगी खा. डॉ सुजय विखे पाटील, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ गोकुळ घोगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे, माजी नगराध्यक्ष कैलासबापू कोते, नगराध्यक्षा अर्चनाताई कोते, उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभुवन, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, भाजपचे नगरसेवक शिवाजी गोंदकर, नगरसेवक अभय शेळके, जगन्नाथ गोंदकर, गटनेते अशोक गोंदकर, सुजित गोंदकर, सचिन कोते, महेश लोढा, नगरसेविका छायाताई शिंदे, सविता शेजवळ,

नितीन कोते, माजी नगराध्यक्ष अलकाताई शेजवळ, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष सचिन तांबे, विलास आबा कोते, साईनिर्माण करिअर कॅडमीचे संचालक ताराचंद कोते, गोपीनाथ गोंदकर, राजेंद्र कोते, अरविंद कोते, भाजपचे रविंद्र गोंदकर, गणेश कारखान्याचे तज्ञ संचालक रामभाऊ कोते, प्रमोद गोंदकर, तुकाराम गोंदकर, अशोक कोते,

रवींद्र कोते, अजय नागरे, गजानन शेर्वेकर, अशोक पवार, सचिन शिंदे, भाजयुमोचे प्रदेश सदस्य किरण बोराडे, गणेश कोते, अभिजीत कोते, विकास गोंदकर, किरण कोते, साईराज कोते, सोमनाथ कावळे आदी मान्यवरांसह शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक गंधाले तसेच मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी आ.विखे पाटील म्हणाले की लोकांचे श्रद्धास्थान असलेले मंदिरे, मस्जिद सरकारने उघडावी यासाठी आज आंदोलन करण्याची वेळ येतेय यासाठी राज्य सरकारचा किती निषेध करावा तेवढा थोडाच आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून प्रत्येक समाज घटकांना आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करून रस्त्यावर उतरावे लागत आहे. आणि आता अध्यात्मिक क्षेत्रसुद्धा त्यापासून दूर राहिले नाही, त्यामुळे आमची मागणी आहे की राज्यातील सर्व धार्मिक प्रार्थनास्थळे खुली करावी.

आषाढी वारीपासून नकाराची घंटा या सरकारने सुरू केली. माऊलींंच्या तसेच तुकाराम महाराजांच्या पादुका हेलिकॉप्टरने घेऊन गेले पाहिजे, संचारबंदी करून भाविकांना पंढरपुरात येऊ द्यायचे नाही असे अनेक प्रकारचे निर्णय या सरकारच्या काळामध्ये होताना दिसत आहे. आजचे हे साई मंदिरासमोरील आंदोलनत सर्व समाजाच्या नागरिकांनी सहभाग घेतला असून शिर्डी तसेच पंचक्रोशीतील अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे.

येथील शेतकरी पूर्णपणे उदध्वस्त झाला आहे याकामी साई संस्थानने पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. शिर्डी शहरातील उद्ध्वस्त झालेल्या छोट्या मोठ्या व्यावसायिकांना नव्याने उभे करण्यासाठी या सरकारने आर्थिक पॅकेजची घोषणा करावी ही आमची मागणी असल्याचे त्यांनी बोलून दाखवले.

देशात अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून तिरुपती तसेच वैष्णोदेवी सारखी तीर्थक्षेत्रे खुली करण्यात आली आहेत, मात्र एवढ्या मोठ्या साईबाबांचे मंदिर गेल्या सहा महिन्यांपासून बंद ठेवले आहे. आता या सरकारकडून काही अपेक्षा राहिली नसून निदान देवांकडून तरी पूर्ण करू द्या. साईबाबांचे चमत्कार पूर्ण जगाला माहित आहे. सरकारला जाग येण्यासाठी मानवीय दृष्टिकोनातून जे काही प्रयत्न करायचे ते सर्व करून झाले असल्याने आता चमत्काराची अपेक्षा आहे. दरम्यान उपासमारीने शिर्डीकर मरत आहेत. शासनाला विनंती करत आहे त्यांनी आमची विनंती मान्य करावी अन्यथा शिर्डी ग्रामस्थ म्हणून आम्हाला तो अधिकार असून साईंचे मंदिर उघडून दर्शन घेण्यासाठी आम्ही मागेपुढे पाहणार नाही.

- खा. डॉ. सुजय विखे पाटील

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com