शिर्डीत मटका, जुगार अड्ड्यावर पोलिसांना आढळली तलवार

तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल
शिर्डीत मटका, जुगार अड्ड्यावर पोलिसांना आढळली तलवार
File Photo

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

शिर्डीत (Shirdi) दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असून शिर्डी (Shirdi) शहरातील श्री साईबाबा रूग्णालयालगत (Shri Sai Baba Hospital) असलेल्या मटका (Mataka) पेढीवर पोलीसांनी छापा (Police Raid) घातला असता जुगार (Gambling) साहित्याबरोबरच तलवार आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. तीन जणांविरुद्ध शिर्डी पोलीसांनी (Shirdi Police) जुगार कायदा व आर्म अँँक्ट नुसार गुन्हा दाखल केला असून एका तरूणाला पोलीसांनी ताब्यात घेतले. दोन जण मात्र फरार होण्यात यशस्वी झाले.

दरम्यान जिल्ह्यात शिर्डी (Shirdi) सारख्या धार्मिक ठिकाणी अनेक गुन्ह्यांची नोंद पोलीस दप्तरी आहे. आंतराष्ट्रीय तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असलेल्या शिर्डी शहराची (Shirdi City) वाटचाल गुन्हेगारीचे शहर म्हणून होत आहे. त्यातच कल्याण मटका, जुगार,अवैद्य गावठी दारूचे अड्डे हे तर भर नागरी वस्तीत सर्रासपणे सुरू आहे. श्री साईबाबा रूग्णालयालगत (Shri Sai Baba Hospital) सुरू असलेल्या मटका (Mataka) जुगाराची (Gambling) गुप्त माहिती एका खबरीने पोलिसांना देताच पोलीसांनी सदर ठिकाणी छापा (Raid) मारून जुगाराचे सर्व साहित्य व रोख रक्कम जप्त केले आहे. याठिकाणी विजय तुकाराम जाधव हा इसम पोलिसांना मिळून आला आहे.त्याच्याकडे विचारपूस केली असता ही पेढी सुनील जेजुरकर आणि अनुप गायकवाड हे चालवत असून शिर्डी (Shirdi) आणि परिसर या सर्व ठिकाणच्या मटका पेढीचा मालक अनुप गायकवाड असल्याची कबुली जाधव याने दिली.

यावेळी गौरव राऊत या पोलीस शिपायाने विजय जाधव यांस ताब्यात घेऊन सदर दुकानाची झडती घेतली असता त्यांना तलवारीसारखे घातक शस्र मिळून आले. मात्र संधीचा फायदा घेत दोणजण पसार झाले तर विजय जाधव याला ताब्यात घेऊन शिर्डी पोलीस स्टेशनला हत्यारासह जमा करून गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

या घटनेबाबत पोलीस शिपाई गौरव राऊत यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार विजय तुकाराम जाधव, सुनील जेजुरकर व अनुप गायकवाड यांच्यावर बॉम्बे जुगार ऍक्ट 12 (अ) आणि 4/25 आर्म ऍक्ट नुसार गुन्ह्यांची नोंद केली असून यापैकी विजय जाधव याला अटक केली असून बाकी दोन आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहे. शिर्डीतील वाढती गुन्हेगारी व अवैध व्यवसाय रोखण्याच्या सुचना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नुकत्याच शिर्डी दौर्‍यावर असतांना पोलीसांना दिल्या होत्या. मात्र या सुचनांचे पोलीसांनी दखल घ्यायला उशिरा का होईना सुरवात केली जरी असली तरी शिर्डी शहरातील वाढत्या गुन्हेगारीला पायबंद घालण्यासाठी शिर्डी पोलीसांना सातत्याने अपयश येत असल्याने पोलीसांच्या कार्यक्षमतेवर नागरीकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Related Stories

No stories found.