
राहाता |प्रतिनिधी| Rahata
शिर्डी लोकसभा मतदार संघातील ठाकरे गटाच्या पदाधिकार्यांची बैठक शनिवारी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर पार पडली. यावेळी प्रत्यक्षात काय घडले, याची निश्चित माहिती समोर आलेली नसली तरी इच्छुक उमेदवारांच्या समर्थकांनी केलेल्या आक्रमक दाव्यांमुळे खुद्द पक्षप्रमुख ठाकरे अडचणीत आल्याचे समोर येत आहे.
शिर्डी लोकसभा मतदार संघातील ठाकरे गटाच्या पदाधिकार्यांची बैठक शनिवारी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर पार पडली. बैठकीला वाकचौर व घोलप या दोन्ही गटाचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीतील चर्चेबाबत वौकचौरे व घोलप समर्थकांनी वेगवेगळे आणि परस्परविरोधी दावे केले आहेत. वाकचौरे समर्थकांच्या दाव्यानुसार, बबनराव घोलपांनी माझ्यासह पक्षाच्या अडचणी वाढविल्या. वाकचौरे यांची उमेदवारी फायनल असून त्यांच्या विजयासाठी शिवसैनिकांनी कामाला लागा, असे आदेश ठाकरे यांनी दिल्याचे सांगितले.
तर वाकचौरे यांचा फक्त प्रवेश करून घेतला असून त्यांची उमेदवारी अद्याप निश्चित नाही. संघटना मजबुत करा, पक्ष वाढवा. पक्ष जो उमेदवार देईल त्याचे काम करा, असा आदेश पक्षप्रमुख ठाकरे यांनी बैठकीत दिल्याचा दावा माजी मंत्री बबनराव घोलप समर्थकांनी केला.
घोलप गटाच्या पदाधिकार्यांनी पक्षप्रमुख ठाकरे यांच्यासमोर वाकचौरे यांच्या उमेदवारीला विरोध केला. लोखंडे यांनी गद्दारी केली. तोच प्रकार वाकचौरे यांनीही शिवसेनेशी केला आहे. त्यामुळे प्रामाणिक शिवसैनिकाला उमेदवारी द्या. शिर्डी मतदार संघात शिवसैनिक संभ्रमावस्थेत आहे. त्यावर वाकचौरे यांचा प्रवेश करून घेतला आहे. त्यांची उमेदवारी अद्याप निश्चित केली नाही.
पक्ष जो उमेदवार देईल त्याचे काम करा, असा आदेश ठाकरे यांनी दिल्याचे घोलप समर्थकांनी सांगितले. तर घोलपांनी माझ्यासह पक्षाच्या अडचणी वाढविल्या आहेत. भाऊसाहेब वाकचौरे यांची उमेदवारी फायनल असून शिवसैनिकांनी पक्षाने दिलेल्या उमेदवाराच्या विजयासाठी कामाला लागा अशा सुचना पक्षप्रमुख ठाकरे यांनी दिल्याचे वाकचौरे समर्थक सांगत आहेत.
माजी खा. वाकचौरे व माजी मंत्री बबनराव घोलप समर्थकांनी दावे प्रतिदावे केल्याने मतदारसंघात पक्षात संभ्रमावस्था निर्माण झाली असून पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.