शिर्डीत आंतरराष्ट्रीय नॉलेज हब सुरू करावे

शरद पवार यांच्याकडे मागणी
शिर्डीत आंतरराष्ट्रीय नॉलेज हब सुरू करावे

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र शिर्डी येथे श्री साईबाबा संस्थानच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय नॉलेज हब सुरू करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष दीपक गोंदकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना निवेदनाद्वारे केली आहे.

शरद पवार हे शिर्डी विमानतळावर आले असता त्यांचे शिर्डी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जल्लोषात स्वागत केले. यावेळी दीपक गोंदकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विश्वाला सर्वधर्म समभावाची शिकवण देणार्‍या श्री साईबाबांचे आपण नि:स्सीम भक्त आहे. शिर्डी येथे आंतरराष्ट्रीय नॉलेज हब सेंटर सुरू करण्याबाबत सुतोवाच केले होते. तसेच त्यासाठी साईसंस्थान व लोकप्रतिनिधींशी चर्चा करून याबाबत तातडीने कार्यवाही करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख व तत्कालीन उच्च तांत्रिक शिक्षणमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी चर्चा करून शिर्डीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे नॉलेज हब सुरू करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानंतर ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली सरकारने उच्चस्तरीय समिती स्थापन केली होती.

साईबाबा संस्थान, राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रस्ताव कार्यान्वित करण्याचे आदेश आपण दिले होते. मात्र राजकीय हस्तक्षेपामुळे गेल्या पंधरा वर्षांपासून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रलंबित आहे. महाराष्ट्र शासनाने साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाची नेमणूक केली असून साई संस्थानच्या माध्यमातून शिर्डी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे नॉलेज हब सुरू करणेबाबत आपण व्यक्तिशः या प्रश्नाला चालना द्यावी आणि याबाबत सूचना करण्यात यावी अशी मागणी दीपक गोंदकर यांनी केली आहे. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष महेंद्र शेळके, राष्ट्रवादीचे नेते रमेश गोंदकर, बाबासाहेब कोते, राहाता तालुका उपाध्यक्ष सुधाकर शिंदे, निलेश कोते, अमित शेळके, सुनील गोंदकर, राकेश कोते, प्रकाश गोंदकर, गणेश गोंदकर, सत्यजित शेळके, भागवत कोते, साई कोतकर, गंगाधर वाघ, निलेश शिंदे, सिद्धार्थ गोतीस, लखन वाकचौरे, नदीम शेख, युनूस सय्यद आदींच्या सह्यानिशी निवेदन देण्यात आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com