'या' कारणावरून शिर्डीतील डॉक्टरास केली धक्काबुक्की

'या' कारणावरून शिर्डीतील डॉक्टरास केली धक्काबुक्की

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

साईबाबा संस्थानच्या कोव्हिड सेंटरमध्ये साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे डॉ. सचिन बगाडे

बुधवार दि.14 रोजी राऊंड घेण्यासाठी गेले असता त्यांना अज्ञात करोना बाधित रुग्णांच्या नातेवाईकांनी हात पकडून धक्काबुक्की केल्याचा निंदनीय प्रकार घडला असून या घटनेने संस्थानच्या डॉक्टरांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून डाँक्टरांनी निषेध केला.

दरम्यान राज्यात तसेच अहमदनगर जिल्ह्यात करोना बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. रुग्णांसाठी हाँस्पिटलमध्ये बेड शिल्लक नाही, ऑक्सिजनची कमतरता, रेमडेसिवर इंजेक्शनचा तुटवडा अशा अनेक कारणांमुळे करोनाबाधीत रुग्णांचे नातेवाईक त्रस्त झाले आहेत.

यामुळे नातेवाईकांची राग अनावर होणे सहाजिकच आहे. परंतु देवदूत म्हणून डॉक्टर,नर्सेस, ब्रदर आपले कर्तव्य चोखपणे बजावत आहेत. राज्य शासन वारंवार करोनापासून बचाव करण्यासाठी जनतेला नियमांचे पालन करण्याचे आवाहन करत आहे. असे असताना डॉक्टर मंडळी आपल्या स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकांचे प्राण वाचवण्याचे काम करत आहेत. याबाबत माहिती अशी की साई संस्थानच्या सुपर स्पेशलिटी रुग्णालयातील डॉ.सचिन बागडे हे बुधवारी संस्थानच्या निमगाव हद्दीतील कोव्हिड सेंटरमध्ये राऊंड घेण्यासाठी गेले होते.

तेथे जाण्यापूर्वीच करोनाचा संसर्ग होऊन अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याचे डॉ. बागडे यांनी सांगितले, मात्र रुग्णांच्या नातेवाईकांनी डॉ. बगाडे यांना टार्गेट करत दमबाजी करून त्यांचा हात पकडला व धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला. ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. या प्रकारामुळे साईबाबा संस्थानच्या साईनाथ रुग्णालय तसेच साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील डॉक्टर, नर्सेस, ब्रदर यांच्यावर भीतीचे सावट पसरले आहे. अशाप्रकारे डॉक्टरांना दमबाजी मारहाण झाली तर कोव्हिड सेंटरमध्ये डॉक्टर, ब्रदर तसेच नर्सेस ड्युटी करायला धजावणार नाही.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com