शिर्डी : 3 महिन्यांपासून पगार नाही

शिर्डी : 3 महिन्यांपासून पगार नाही

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

जिल्ह्यामध्ये काही आरोग्य कर्मचार्‍यांचे पगार रखडले असून गेल्या तीन महिन्यांपासून आरोग्य सेवकांचे अद्याप पगार मिळालेला नाही.

यासाठी राहाता तालुक्यातील आरोग्य कर्मचार्‍यांनी तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना नियमित पगार होण्याचे निवेदन देण्यात आले.

लॉकडाऊनच्या काळात पगार नसल्यामुळे अनेकांनी हात उसनवार करून आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी पैसे घेतले आहेत. काही आरोग्य कर्मचार्‍यांचे पगार वेळेवर होतात; परंतु काही आरोग्य कर्मचार्‍यांचे पगार वेळेवर होत नाही.

यासाठी वेळेवर पगार होण्याचे निवेदन तहसीलदार व गटविकास अधिकारी राहाता यांच्याकडे आरोग्य कर्मचार्‍यांकडून देण्यात आले. यावेळी राहाता तालुक्यातील आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com