शिर्डीत मोकाट कुत्र्यांची दहशत

File Photo
File Photo

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

शहरातील एक रस्ता, गल्ली किंवा चौक असा नाही की तिथे मोकाट कुत्र्यांमुळे नागरिक त्रस्त नाही. आज शहराच्या विविध भागात साधारणत: वीस ते तीस माणसांमागे एक कुत्रा मोकाट फिरत असून काही ठिकाणी तर या कुत्र्यांच्या टोळक्यांनी चांगलीच दहशत निर्माण केली आहे़. हे मोकाट कुत्रे रात्री-अपरात्री मोठ्या प्रमाणावर भुंकत असून त्यामुळे नागरिकांच्या झोपेवर परिणाम होत आहे. तसेच ते कुठेही घाण करत असल्याने दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे.

या कुत्र्यांच्या दहशतीमुळे रात्रीच्या वेळी रस्त्यावरून चालणे, दुचाकी घेऊनही बाहेर पडले तर कधी यांचा पाठलाग सुरू होईल याची धास्ती प्रत्येकाच्या मनात कायमच राहत आहे. यातील अनेक कुत्र्यांना त्वचारोगाचा संसर्ग झाला आहे. आधीच रोज सुरु असलेला पाऊस, त्यात या मोकाट कुत्र्यांच्या सुळसुळाटाने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. शहरातील अनेक नागरिक, हॉटेल व्यावसायिक तसेच साईभक्त चांगल्या भावनेने या भटक्या कुत्र्यांना स्व:खर्चाने दररोज खाद्यपदार्थ देतात.

मुक्या प्राण्यांवर दया-प्रेम दाखविणे हे वावगेही नाही. मात्र आज शहरातील अशी काही ठिकाणे व रस्ते आहेत की जेथे दररोजच्या ठराविक वेळी ही मोकाट व भटकी कुत्री जमा होतात. एखाद्यावेळी खाद्यपदार्थ देणारी गाडी आली नाही, तर ही कुत्री सैरावैरा होऊन येणार्‍या-जाणार्‍या नागरिकांना तसेच भक्तांना मोठा त्रास देतात. त्यामुळे काही जणांना पुण्य कमविण्याचा सोस इतरांच्या मात्र अंगलट येत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com