शिर्डीत विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीची अज्ञातांकडून विटंबना

शिर्डीत विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीची अज्ञातांकडून विटंबना

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

शिर्डी येथील जुन्या पिंपळवाडी रोडलगत वैदूवाडीमध्ये श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर असून मंदिरातील रुक्मिणी मातेच्या मूर्तीची अज्ञात समाजकंटकांनी विटंबना केल्याने काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून सदरची घटना समजताच शिर्डी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन क्रुर कृत्य करणार्‍यांंवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन देऊन जमलेल्या जमावास शांत राहण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

शिर्डी येथील जुन्या पिंपळवाडी रोडलगत वैदूवाडी येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर असून त्या मंदिरात श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी माता यांच्या सुंदर मूर्ती आहे. या मंदिरातील देवी रुक्मिणी यांच्या मूर्तीची अज्ञात समाजकंटकांनी विटंबना केल्याने मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी जमा झाली होती. या घटनेची माहिती शिर्डी पोलीस स्टेशनला मिळताच पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी हजर झाला.

शिर्डीत विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीची अज्ञातांकडून विटंबना
Good Bye 2021 : करोनाने शिर्डीची आर्थिक चाळण; शेतकरीही अडचणीत

या मंदिरात शिर्डी ग्रामस्थांसह साईभक्त दर्शनास येत असतात, असे असताना अज्ञात समाजकंटकांनी मंदिरातील श्री रुक्मिणी देवीच्या मूर्तीची विटंबना केली आहे. रविवार दि. 26 रोजी सकाळी सदर घटना भाविकांच्या लक्षात आल्यानंतर या विटंबनेची परिसरात वेगाने चर्चा पसरली. त्यामुुळे भाविक आणि ग्रामस्थांनी मंदिरात धाव घेतली. या घटनेमुळे ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला. सर्व धर्मियांकडून निषेध व्यक्त केला आहे. शिर्डी शहरामध्ये सध्या नाताळच्या सुट्ट्यांमुळे गर्दी होत आहे.

सदरचे मंदिर गर्दीच्या ठिकाणी असल्यामुळे बघणार्‍यांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी संजय सातव व पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी शांततेचे आवाहन केले. सर्व भाविक, साईभक्त, ग्रामस्थ यांनी कोणत्याही अफवेला थारा देऊ नये, शांतता पाळावी, गर्दी करू नये, श्री रुक्मिणी मातेची विटंबना करणार्‍या अज्ञात समाजकंटकांचा त्वरित शोध घेतला जाईल. त्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन यावेळी पोलीस अधिकार्‍यांनी दिले. या घटनेबाबत पंडित सिताराम गुडे यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com