शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

तृप्ती देसाई यांना सुपा येथे पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर शिर्डीत घोषणाबाजी व फटाके फोडून

जल्लोष केल्या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, फलक वादावरून तृप्ती देसाई व तिचे कार्यकर्ते पुण्याहून शिर्डीकडे येण्यास निघाल्या होत्या. परंतु त्यांना सुपा येथे अटक केल्याने शिर्डीत जल्लोष करून घोषणाबाजी व फटाके फोडल्या प्रकरणी आंदोलकांवर शिर्डी पोलीस ठाण्यात भादवी कलम 188, 269 चे कलम 51 प्रमाणे गुरुवारी दीपक गंधाले यांच्या फिर्यादी वरून एकूण बारा लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

साईबाबा मंदिर परिसरात तृप्ती देसाई यांचे आंदोलन होते त्याला विरोध करण्यासाठी तीस ते चाळीस जण एकत्र आले होते. आनंद दवे, धनंजय पाटील, वंदना राजेंद्र गोंदकर, मनीषा सचिन शिंदे, रेखा वैद्य, स्वाती परदेशी, अलका कोते, सुनील परदेशी, नानासाहेब बावके, शिवाजी चौधरी, शोभा वर्पे, रुपाली तांबे व इतर तीस ते चाळीस लोक साईबाबा संस्थान च्या गेट नबंर चार जवळ बेकायदेशीर जमून भुमाता बिग्रेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यास अटक झाल्याने गेट नंबर चार जवळ एकत्र येऊन जिल्हाधिकारी अहमदनगर यांचे आदेश झुगारून घोषणा देत फटाके फोडले व म्हणून यांच्या विरोधात आदेश क्रमांक डी सी / कार्या/9 ब 1/2141/ 2020 अहमदनगर याचे आदेशाचे उल्लंघन करतांना आढळून आले म्हणून साथ प्रतिबंधक कायदा 1897 चे कलम 2 प्रमाणे तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास शिर्डी पोलिस करीत आहेत.