34 पॉझिटिव्ह
34 पॉझिटिव्ह
सार्वमत

शिर्डीत 7 जण करोना पॉझिटिव्ह

शिर्डीतील व्यापार्‍याच्या एकाच कुटुंबातील सहा जणांचा समावेश

Arvind Arkhade

शिर्डी|शहर प्रतिनिधी|Shirdi

करोनामुक्त शिर्डी शहर होऊ पाहणार्‍या साईबाबांच्या नगरीत करोनाने पुन्हा डोके वर काढलेे असून काल तब्बल नव्याने सात जणांना करोनाची बाधा झाली असून त्यात एक मोठ्या व्यापार्‍याच्या कुटुंबातील सहा जणांचा समावेश आहे. आत्तापर्यंत शहरातील करोना बाधितांची संख्या 14 वर जाऊन पोहचली आहे.

लॉकडाऊनच्या अडीच महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील बाधितांची आकडेवारी तुरळक होती. तर आंतरराष्ट्रीय शहर असलेल्या शिर्डीत बोटावर मोजण्या इतकेच रुग्ण होते. मात्र मागील पंधरा दिवसांंत शहरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत गेल्याने आतापर्यंत चौदा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

मागील आठवड्यात शहरातील एका नामंकित पतसंस्थेचे अध्यक्ष बाधित आढळून आले त्यानंतर काल पुन्हा शहरातील ओमसाई नगर मधील एकाच कुटुंबातील सहा आणि आणखी एक अशा सात व्यक्तींना करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न होताच प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. एकाच कुटुंबातील बाधित रुग्ण असल्याने ते कोणाच्या संपर्कात आले होते याचा शोध घेण्याचे कार्य नगरपंचायतमार्फत युद्धपातळीवर सुरू आहे.

यासाठी नगरंपचायतचे पथक तसेच महसूल प्रशासन काल सकाळपासून संबंधित सात बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेत आहे. मात्र पुरेशी माहिती मिळत नसल्याची खंत यावेळी पथकातील अधिकार्‍यांनी व्यक्त केली.

दरम्यान करोना संक्रमित आढळून आल्यानंतर त्या व्यक्तीने आपण कोणाच्या संपर्कात आलो ते स्वतःहून प्रशासनाला सांगणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रशासकिय यंत्रणेला काम करणे सोपे होईल. तसेच बाधित लोकांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन क्वारंटाईन करता येईल आणि करोनाचा फैलाव थांबून चेन तुटण्यास मदत मिळेल.

शहरवासियांना आता आपल्या सुरक्षेची अधिक काळजी घेण्याची जास्त गरज असल्याचे आवाहन नगरपंचायतचे नोडल अधिकारी मुरलीधर देसले यांनी केले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com