शिर्डीत बांधकाम मजुरावर खुनी हल्ला

प्रकृती चिंताजनक
शिर्डीत बांधकाम मजुरावर खुनी हल्ला

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

शिर्डीत (Shirdi) 42 वर्षीय बांधकाम मजुरावर चार अज्ञात हल्लेखोरांनी (Attack) अंगाखांद्यावर धारदार शस्राने वार (Strike with a sharp weapon) करून गंभीररीत्या जखमी (Injured) केल्याची घटना घडली. या मजुराची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेने शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिर्डी पोलिसांनी (Shirdi Police) घटनास्थळी धाव घेतली. मात्र याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्याचे कामकाज सुरू होते.

याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी, राजू अंतवन धीवर (वय 42, रा. कालीकानगर, शिर्डी ता. राहाता) येथील रहिवासी असून सेंट्रींगचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. सदर इसमाचे कोणाशीही वाद नसल्याचे नातेवाईकांनी सांगितले. मंगळवारी नेहमीप्रमाणे आपले कामकाज उरकून संजय नामक जोडीदारासोबत घरी पायी येत असताना नगर-मनमाड महामार्गावरील साकुरी शिवजवळील अज्ञात चोघांनी त्यांच्याकडे माचीस मागण्याचा बहाणा करत धारदार शस्राने धीवर यांच्यावर हल्ला चढवला यावेळी हल्लेखोर हल्ला करून तेथून पसार झाले असल्याचे प्रत्यक्षदर्शी संजय नामक इसमाने सांगितले.गंभीर जखमी अवस्थेत पडलेल्या राजू धीवर यांना तातडीने साईबाबा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

दरम्यान घटनेची माहिती शिर्डी पोलीसांना (Shirdi Police) समजताच पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे, सहा पोलीस निरीक्षक दीपक गंधाले,सहा पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचे वृत्त शहरात वार्‍यासारखे पसरताच दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते (atmosphere of terror was created). धीवर यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले.घटनेचे गांभीर्य लक्षात घेता शिर्डी पोलीसांनी तातडीने हल्लेखोरांचा तपास सुरू (Investigation into the attackers continues) केला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com