शिर्डीत काँग्रेस कमिटीचे धरणे आंदोलन

काँग्रेसचे नेते राहुल गांधी व सोनिया गांधी यांची सुडबुध्दीने ईडी चौकशी
शिर्डीत काँग्रेस कमिटीचे धरणे आंदोलन

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणी खा. राहुल गांधी यांच्या विरोधात षडयंत्र रचून खोटे आरोप करत सूडबुद्धीने ईडी चौकशीच्या माध्यमातून मुस्कटदाबी करु पाहणार्‍या भाजपा-मोदी सरकारच्या दडपशाही, हुकूमशाही असा आरोप करत केंद्र सरकारच्या विरोधात शिर्डी शहरात काँग्रेस कमिटीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.

शिर्डी शहरात प्रांत कार्यालयासमोर आखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्यावतीने काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते तथा महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, आ. डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या विरोधात षडयंत्र रचून खोटे आरोप करत ईडीची चौकशी सुरू केली, तसेच काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांना पोलिसांकडून मारहाण करणे, बळाचा वापर करून त्यांच्या राहत्या घराला घेराव घालणे यासारख्या घटनांचा निषेध करून यावेळी केंद्र सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी काँग्रेसचे नेते सुरेश थोरात, विश्वस्त डॉ. एकनाथ गोंदकर, अविनाश दंडवते, शिर्डी शहराध्यक्ष तथा नगरसेवक सचिन चौगुले, नगरसेवक प्रसाद शेळके, युवकचे अध्यक्ष अमृत गायके, उत्तमराव मते, श्री. गाडेकर, श्री. पगारे, रमेश गागरे, सुभाष निर्मळ, नितीन सदाफळ, श्रीकांत मापारी, सचिन गाडेकर, नगरसेवक सुरेश आरणे, उमेश शेजवळ, समीर शेख, अ‍ॅड. अविनाश शेजवळ, गोविंद कोते, मदन मोकाटे, राजू बर्डे, पंकज लोंढे, आसिफ इनामदार, मोहसीन सय्यद, संतोष वाघमारे, डॉ. गोविंद भडांगे, अमोल कोते, योहान गायकवाड, योगेश निरभावणे, पापाभाई पठाण, तुषार शेजवळ, विजय पवार, तुषार शेजवळ, दीपक चौगुले, स्वयंम चौगुले, मच्छिन्द्र गुंजाळ, शाकिर शेख, कृष्णा गायकवाड, अक्षय शिंदे, साई गोरे, ज्ञानेश्वर हातांगळे,रजमहम्मद शेख, चंद्रभान पवार, रवींद्र इंगळे, अनिल दाते, निलेश डांगे, प्रवीण गाडेकर, प्रसाद बोठे, सागर कोळगे, गौतम आहेर, शाकिर शेख, शहानवाज मणियार, संदीप कोकाटे, बबनराव नळे, आदींसह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी प्रांत कार्यालयातील अधिकार्‍यांना आपल्या मागणीचे निवेदन देण्यात आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com