शिर्डीतील स्वच्छता कर्मचार्‍यांना दोन महिन्याची थकीत बाकी

शिर्डीतील स्वच्छता कर्मचार्‍यांना दोन महिन्याची थकीत बाकी

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

खर्‍या अर्थाने लोकशाहीचा चौथा स्तंभ असल्याचे शिर्डी नगरपंचायतच्या स्वच्छता कर्मचार्‍यांनी म्हणत दैनिक सार्वमतने सातत्याने आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न केला असून

आमच्या दोन महिण्यांच्या थकीत पगारबाबत शुक्रवारी सार्वमतमध्ये बातमी येताच त्याच दिवशी सायंकाळी आम्हा सर्व कर्मचार्‍यांना एका महिन्याचे पगार देण्यात आले असल्याची माहिती स्वच्छता कर्मचार्‍यांनी दिली आणि दैनिक सार्वमतचे आभार व्यक्त केले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शिर्डी नगरपंचायतचा शहर स्वच्छतेपोटी बीव्हीजी कंपनीला देण्यात येणारा दरमहा 42 लाख 50 हजार रुपयांचा ठेका नोव्हेंबर 2020 पासून करारानुसार पुर्ववत करण्यात आला मात्र मागील दोन महिण्यांपासून देशातील नावाजलेल्या कंपनीने स्वच्छता कर्मचार्‍यांचे पगार थकवल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आणली होती.

ठेकेदार थकीत रकमेसाठी नगरपंचायत तसेच संस्थान प्रशासनाकडे बोट दाखवून कर्मचार्‍यांना वेठीस धरत वेळ काढून नेत होता. मात्र या गोरगरीब लोकांना न्याय देण्यासाठी लोकशाहीचा चौथा स्तंभ या सर्व घडामोडीवर लक्ष ठेवून असल्याने दैनिक सार्वमतने या वृत्ताची दखल घेऊन बातमी प्रसारित करताच सर्व कर्मचार्‍यांचा सायंकाळी किमान एक महिण्याचे पगार ठेकेदाराकडून देण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी कर्मचार्‍यांनी आनंद व्यक्त करत वेळोवेळी आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेल्या सार्वमत वृत्तसमुह तसेच पत्रकार राजकुमार जाधव यांचे आभार मानले. नोव्हेंबर आणी डिसेंबर या दोन महिन्यांचे स्वच्छता कर्मचार्‍यांचे पगार ठेकेदाराने थकवले होते काल शुक्रवारी नोव्हेंबर महिण्याचा पगार मिळाला आहे.

अजून डिसेंबर 2020 चा पगार बाकी आहे. चालू महिण्याचाही पुर्ण होत असल्याने एकूण दोन महिण्यांचा पगार प्रलंबित राहाणार आहे. भविष्यात या उपासमार टाळण्यासाठी वेळेवर पगार करायला पाहिजे, असे मत शिर्डी शहरातील सुज्ञ नागरीकांनी व्यक्त केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com