शिर्डी |प्रतिनिधी|Shirdi

स्वच्छ सर्वेक्षण 2021 व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत शिर्डी नगरपंचायतद्वारे नाला सफाई अभियान राबविण्यात आले.

देशातील सर्व शहरांमधील नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे यासाठी केंद्र शासनाकडून संपूर्ण देशामध्ये स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे. तसेच याचाच एक भाग म्हणून संपूर्ण राज्यात जल, वायू, आकाश, अग्नी, पृथ्वी या पंचतत्वावर आधारीत माझी वसुंधरा अभियान सुरू झाले आहे.

शिर्डी शहरात स्वच्छ सर्वेक्षण 2021 व माझी वसुंधरा अभियान गतिमान करण्यात आले आहे. शिर्डी शहराचा स्वच्छ सर्वेक्षण अभियानात अव्वल नंबर येणेसाठी नगरपंचायतीने विविध कार्यक्रमांचे नियोजन केलेले आहे. त्याचाच एक भाग म्हणून सातभाई मळा येथील नाल्याची सफाई करण्यात आली. सदर नालासफाई करतेवेळी सर्वांनी पर्यावरण रक्षणाची प्रतिज्ञा घेतली.

यावेळी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, नगरसेवक दत्तात्रय कोते, रवींद्र गोंदकर,अजित पारख तसेच ग्रिन अॅन्ड क्लीन शिर्डीचे सर्व पदाधिकारी, शिर्डी ग्रामस्थ व शिर्डी नगरपंचायत कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.