मुख्याधिकारी डोईफोडे यांनी स्विकारला पदभार
सार्वमत

मुख्याधिकारी डोईफोडे यांनी स्विकारला पदभार

Arvind Arkhade

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

शिर्डी नगरपंचायतच्या मुख्याधिकारीपदी बदलून आलेले काकासाहेब डोईफोडे यांनी काल पदभार स्विकारला.

शिर्डीचे मुख्याधिकारी सतीश दिघे यांची नांदेड जिल्ह्यातील उमरी येथे तर उमरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांची शिर्डी नगरपंचायतच्या मुख्याधिकारीपदी बदली झाली आहे. श्री. डोईफोडे यांनी सकाळी शिर्डी नगरपंचायतचे सुत्रे हाती घेतली.

डोईफोडे यांनी पदभार स्विकारल्यानंतर नगराध्यक्षा अर्चनाताई कोते, उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभुवन, गटनेते अशोक गोंदकर, नगरसेवक जगन्नाथ गोंदकर, नगरसेवक सचिन कोते, रविंद्र गोंदकर, अ‍ॅॅड. अनिल शेजवळ, पोपट शिंदे आणि कर्मचारीवृंद आदी मान्यवरांनी मुख्याधिकारी डोईफोडे यांचा सत्कार करत स्वागत केले.

मुख्याधिकारी सतीश दिघे यांची बदली झाल्यानंतर सत्ताधारी गटाने दिघे यांना मुदतवाढ मिळावी म्हणून दि. 12 रोजी ठिय्या आंदोलन केले होते. मात्र आता श्री. डोईफोडे यांनी शिर्डी नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी पदाचा कार्यभार हाती घेतला असल्याने दिघे यांच्या मुदतवाढीच्या आशा पुर्णतः मावळल्या असल्याचे बोलले जात आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com