कार्यारंभ आदेश नसल्याने शिर्डी बाह्यवळण रस्त्याचे काम रखडले

कार्यारंभ आदेश नसल्याने शिर्डी बाह्यवळण रस्त्याचे काम रखडले

पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal

राहाता शिर्डी बाह्यवळण रस्त्यासाठी सार्वजनीक बांधकाम विभागाने जवळपास सव्वाबारा कोटीची निविदा काढली असून कत्राटदारही निश्चीत झाला आहे.मात्र कार्यारंभ आदेश नसल्याने बाह्यवळण रस्ताच्या कामास अद्याप सुरूवात झाली नाही. आठ-दहा दिवसांत पावसाळा सुरू होणार असून पावसाळ्यात डांबरीकरण केल्यास काम निकृष्ठ होऊन रस्त्याला मागचे दिवस पुन्हा येण्याची शक्यता आहे.

कोल्हार-कोपरगाव रस्त्यावरील राहाता शिर्डी शहरातील जड वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी पिंपरी निर्मळ ते सावळीविहीर असा तेविस किमीचा रस्ता केला होता. या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. धुळीमुळे बाजुचे रहिवाशी व ग्रांमस्थ बेजार झाले आहे. माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे या बाह्यवळण रस्त्याच्या पिंपरी निर्मळ कडील बाजुच्या सहा कीलोमीटर व निमगाव येथील शेवटच्या एक कीलोमीटर अशा 7 किलोमीटरच्या कामासाठी सार्वजनीक बाधकांम विभागाने जानेवारीत 12 कोटी 19 लाखांची निविदा प्रसिध्द केली होती.

ठेकेदार निश्चीत करण्यासाठी विभागाला पाच महिने लागले. मात्र कंत्राटदाराला विभागाने अद्यापही कार्यारंभ आदेश दिले नसल्याने काम सुरू होऊ शकले नाही. आठ दहा दिवसांत जून महिना सुरू होणार असून पावसाळयाला सुरूवात होणार आहे. पावसाळयात मातीवरच डांबर टाकून रस्त्याचे निकृष्ठ काम केल्याने वर्षभरात रस्ता उखडून गेल्याने ग्रामस्थांना व जड वाहतूकदारांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच आताही पावसाळयातच काम सुरू होणार असल्याची चिन्हे आहेत. मात्र मागील कंत्राटदारासारखेच काम झाल्यास ग्रामस्थांना पुन्हा मागचे दिवस पहावे लागण्याची भीती व्यक्त होत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com