साईबाबांचे दर्शन होणार सुलभ! बायोमेट्रिक पास 'या' तारखेपासून होणार बंद

साईबाबांचे दर्शन होणार सुलभ! बायोमेट्रिक पास 'या' तारखेपासून होणार बंद

शिर्डी | शहर प्रतिनिधी

श्री साई समाधी शताब्दी वर्षात सुरू करण्यात आलेली बायोमेट्रिक दर्शन पास व्यवस्था दि.१ एप्रिल पासून बंद करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाच्या वतीने घेण्यात आला असून या निर्णयाचे भाविकांनी जोरदार स्वागत केले आहे.

दरम्यान यंदाच्या रामनवमी उत्सवासाठी ९५ लाख रुपये खर्चास मंजुरी देण्यात आली. यामध्ये शिर्डी ग्रामस्थ यात्रा कमिटीसाठी २१ लाख रुपये देण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती श्री साईबाबा विश्वस्त व्यवस्थेचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना दिली.

साईबाबांचे दर्शन होणार सुलभ! बायोमेट्रिक पास 'या' तारखेपासून होणार बंद
'साई'नामाच्या गजरात शिर्डीत पार पडली परिक्रमा

दरम्यान शनिवार दि. २६ रोजी श्री साईबाबा विश्वस्त व्यवस्थापन मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीस श्री साई संस्थानचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे, उपाध्यक्ष जगदीश सावंत, विश्वस्त डॉ एकनाथ गोंदकर, विश्वस्त महिंद्र शेळके, विश्वस्त सुरेश वाबळे, विश्वस्त सचिन गुजर, विश्वस्त सुहास आहेर, विश्वस्त अविनाश दंडवते, विश्वस्त जयवंत जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री बानाईत आदी मान्यवरांसह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

यावेळी पत्रकार परिषदेत बोलतांंना आशुतोष काळे म्हणाले कि, दि.१ एप्रिलपासून साईबाबा संस्थानचे वतीने भाविकांना दर्शनासाठी करण्यात आलेली बायोमेट्रिक पास व्यवस्था बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता भाविकांना साईसमाधी मंदिरात दर्शनासाठी बायोमेट्रिक पास काढण्याची गरज भासणार नसून थेट दर्शन रांगेतून जाता येणार आहे. लाडू प्रसाद बनवण्यासाठी स्पर्धा घेऊन त्या स्पर्धेत उत्कृष्ट लाडू प्रसादाची निवड करून त्यानंतर लाडूचे टेंडर देण्यात येणार आहे.

साईबाबांचे दर्शन होणार सुलभ! बायोमेट्रिक पास 'या' तारखेपासून होणार बंद
रंग खेलेंगे 'साई' के संग! शिर्डीत रंगपंचमीचा उत्साह, पाहा VIDEO

कोव्हिडच्या कारणास्तव बंद केलेले मंदिर परिसरातील सत्यनारायण हॉल, अभिषेक हॉल सुरू करण्याचाही निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे द्वारावती गार्डन ही सुरू करण्यात येणार आहे. शुद्ध गाईच्या तुपाबद्दल आलेल्या तक्रारीची दखल घेऊन शासनाच्या नियमाप्रमाणे योग्य तुप खरेदी करण्याचा निर्णय झाला असून त्याचे नमुने तपासूनच पुढील निर्णय घेण्यात येईल. साईमंदिर परिसरात लावण्यात आलेले बँरी गेटिंंग काढून टाकण्यात येणार आहे. रामनवमी यात्रा पूर्वीप्रमाणेच धुमधडाक्यात साजरी करण्यात यावी यासाठी ग्रामस्थांशी चर्चा करण्यात आली आहे. भाविकांना सुलभ दर्शन व्हावे यासाठी आमचे विश्वस्त मंडळ प्रयत्नशील राहणार असल्याची माहिती ना. काळे यांनी दिली.

साईबाबांचे दर्शन होणार सुलभ! बायोमेट्रिक पास 'या' तारखेपासून होणार बंद
गोव्याचे मुख्यमंत्री साई चरणी लीन; शिवसेनेवर डागली तोफ

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com