शिर्डीतून एका दिवसात चार दुचाकींची चोरी

शिर्डीतून एका दिवसात चार दुचाकींची चोरी

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

शिर्डी शहर व परिसरातून मोेटारसायकल चोरीचे प्रमाण वाढले असून शहरातील विविध भागातून काल तब्बल चार मोटारसायकल चोरीस गेल्या आहेत. याप्रकरणी चार वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शिर्डी शहरात मोटारसायकल चोरणारी मोठी टोळी कार्यरत असून पोलिसांना अद्याप त्यांच्यापर्यंत पोहोचता आलेले नाही. त्यामुळे मोटारसायकलचे मालकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.

शिर्डी शहरातील पहिली घटना शिर्डी नगरपंचायतीच्या कॉम्प्लेक्सच्या पार्कींगमध्ये घडली आहे. सतीश बाबुराव गायके यांची एमएच 17 एआर 4007 ही पल्सर - 150 काळया रंगाची मोटारसायकल शिर्डी नगरपालिकेशेजारी असलेल्या कॉम्प्लेक्सच्या पार्कींगमध्ये पार्क केलेली असताना अज्ञात चोरट्याने सदर मोटारसायकलचे लॉक तोडून चोरून नेली आहे. याप्रकरणी शिर्डी पोलिसांत फिर्याद दाखल करण्यात आली असून पोलिसांनी गुरनं. 320/2022 भादंवि कलम 379 प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोनि.गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौ. माघाडे करीत आहेत.

निमगाव कोर्‍हाळे, हॅलीपॅडरोड, चारी नं. 11, कातोरे वस्ती या ठिकाणाहून दोन मोटारसायकल चोरीस गेल्या आहेत. त्यात 20 हजार रुपये किंमतीची बजाज प्लॅटिना 100 नं. एमएच 17 सीबी 6530 आणि 10 हजार रुपये किंमतीची हिरो होन्डा डिलक्स मोटारसायकल नं. एमएच 15 बीटी 5305 चोरीस गेल्या आहेत. या मोटारसायकली सुनील विश्वनाथ होन, रा. हॅलीपॅडरोड, निमगाव कोर्‍हाळे यांच्या घरासमोर लावलेल्या होत्या. दोन्ही मोटारसायकलचे लॉक तोडून चोरांनी त्या चोरून नेल्या आहेत. याप्रकरणी शिर्डी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुध्द गुरनं. 321/2022 प्रमाणे भादंवि कलम 379 प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना. गंभीरे करीत आहेत.

चौथी घटना श्रीसाईबाबा हॉस्पिटलच्या पार्कींगमध्ये घडली आहे. विकास सोनवणे, धंदा मजूरी, रा. सिद्धार्थनगर, वार्ड.नं. 1, श्रीरामपूर यांची हिरो कंपनीची स्प्लेंडर नं. एमएच 17 बीजी 1711 ही 2 जुलै रोजी सकाळी 10.30 ते 12 च्या सुमारास श्रीसाईबाबा हॉस्पिटलच्या पार्कींगमध्ये लावलेली असताना अज्ञात चोरट्याने हॅन्डललॉक तोडून चोरून नेली. याप्रकरणी शिर्डी पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरुध्द भादंवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक वाळके करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com