
शिर्डी | प्रतिनिधी
महाराष्ट्र दिनापासून म्हणजे 1 मे पासून साईबाबांच्या शिर्डीत बेमुदत बंद पाळण्याचा निर्णय मागे घेण्यात आल्याची माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली होती. साई मंदिरातल्या प्रस्तावित सुरक्षाव्यवस्थेच्या मुद्द्यावरुन शिर्डीमध्ये वातावरण तापल्याचं चित्र पाहायला मिळत होते. विखे पाटलांसोबतच्या भेटीनंतर शिर्डी बंदचा निर्णय मागे घेण्यात आला आहे.
राज्याचे महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि शिर्डी ग्रामस्थांची आज शिर्डीत बैठक पार पडली. या बैठकीत साई मंदीराला सीआयएसफ सुरक्षा व्यवस्था लागु करायची की नाही. या बाबत सध्या उच्च न्यायालयत दावा प्रलंबीत असल्याने शिर्डीकर आता उच्च न्यायालयात आपले म्हणने मांडणार असल्याचे ग्रामस्थांचे विखे पाटिल यांच्या बरोबर झालेल्या बैठकित ठरल आहे. त्यामुळे येत्या एक मे रोजी शिर्डीकरांनी दिलेला बंदचा निर्णय ही मागे घेतला आहे. त्याच बरोबर रहिलेल्या बाकीच्या मागण्या संदर्भात शिर्डी ग्रामस्थानचे एक शिष्ट मंडळ लवकरच राज्याचे मुख्यमंत्री यांची भेट घेणार असल्याचही शिर्डी ग्रामस्थानी यावेळी सांगतिले आहे.
काय आहेत शिर्डीकरांच्या मागण्या...
साईबाबा मंदीराला CISF सुरक्षा व्यवस्था नको.. आहेतीच सुरक्षा योग्य
साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पद IAS अधिकारीकडे नको. हे पद रद्द करून, शासनाचा उपजिल्हाधिकारी किंवा तहसीलदार, प्रांत अधिकारीकडे असावे.
साईबाबा संस्थानचे सध्या पाहत असलेले तदर्थ समितीमुळे सर्व कारभार मंदावलेला असून सर्व निर्णय प्रलंबित आहे. तर यावर राज्य शासनाने नियुक्त समिती नेमावी.
शिर्डी साईबाबा संस्थानवर लवकरात लवकर विश्वस्त मंडळ नेमणूक करण्यात यावे. यात शिर्डीतील 50℅ विश्वस्त नेमणूक करावे.