शिर्डीत आंबेडकर जयंतीनिमित्त 131 वृक्षारोपण - शेजवळ

शिर्डीत आंबेडकर जयंतीनिमित्त 131 वृक्षारोपण - शेजवळ

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त शिर्डी शहरात भव्य जयंती उत्सव साजरा करण्यात येणार असून यानिमित्ताने शहरात 131 वृक्षारोपण तसेच 131 युवक रक्तदान करणार असल्याची माहिती जयंती उत्सव कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष नितीन शेजवळ यांनी दिली.

दि. 14 एप्रिल रोजी शिर्डी शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून अ‍ॅड. अनिल शेजवळ, माजी नगराध्यक्षा अलकाताई शेजवळ, कैलास शेजवळ, राहुल भडांगे, शंकर त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली या उत्सवासाठी कमिटी स्थापन करण्यात आली आहे. अध्यक्षपदी नितीन शेजवळ यांची एकमताने निवड करण्यात आली तर कार्याध्यक्षपदी अ‍ॅड. अविनाश शेजवळ, उपाध्यक्ष देवानंद शेजवळ, राजेंद्र शेजवळ, सचिव उमेश शेजवळ, खजिनदार नानासाहेब त्रिभुवन, किरण बर्डे, सहखजिनदार अनिकेत पलघलमड आदींची निवड केली आहे.

कोविडच्या कारणांमुळे गेल्या दोन वर्षापासून थोर पुरुषांच्या जयंती उत्सव साजरा करण्यात आले नाही. यावर्षी करोनाची लाट ओसरली असून देशात सर्वत्र कोविड लसीकरण करण्यात आले आहे.त्यामुळे भारतात कोविडची चौथ्या लाटेचा धोका टळला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कोविडचे नियम अटीशर्ती शिथिल केल्या आहेत. त्यामुळे दोन वर्षानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.

शिर्डी शहरात हा उत्सव साजरा करतांना यंदाच्या वर्षी सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देण्यात आले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप याबरोबरच गरीब विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी भरणे, अनाथ आश्रमात फळे वाटप, रांगोळी स्पर्धा, शहरातून शोभायात्रा अशा उपक्रमांनी यंदाचा जयंती उत्सव साजरा होणार असल्याचे अध्यक्ष नितीन शेजवळ यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com